फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये गतविजेत्या फ्रान्सने इंग्लंडवर २-१ च्या फरकाने विजय मिळवत उपांत्य सामन्यातील स्थान निश्चित केलं आहे. हे दोन्ही बलाढ्य संघ तब्बल ४० वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आमनेसामने आले होते. या सामन्यामध्ये अगदी ७८ व्या मिनिटाला फ्रान्सने केलेला गोल आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने ऐनवेळी चुकवलेली पेनल्टीच्या (Harry Kane miss penalty) संधीमुळे इंग्लंडचा स्पर्धेतून गाशा कुंडाळावा लागला.

सामन्यातील १८ व्या मिनिटालाच ऑरेलियन टिचोयुमेनीने फ्रान्सला १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये अगदी नवव्या मिनिटाला इंग्लंडने १-१ ची बरोबरी केली. कर्णधार हॅरी केनने पेनल्टीचं रुपांतर गोलमध्ये करत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र ७८ व्या मिनिटाला पुन्हा फ्रान्सने आघाडी घेतली आणि हीच आघाडी निर्णायक ठरली. ऑलिव्हिएर जिरूडने फ्रान्सकडून दुसऱ्या गोल केला.

Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
WTC Points Table India slip to 3rd after after IND vs AUS Pink Ball Test Defeat Australia No 1 again
WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
England reach 500000 Test runs first team to achieve landmark
England World Record: ५ लाख धावा! इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
KL Rahul and Kane Williamson Both Survives on No Ball After Getting Out in IND vs AUS & ENG vs NZ Test
नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटना

सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना इंग्लंडला पेनल्टी मिळाली. मात्र कर्णधार हॅरी केनला या पेनल्टलीचं रुपांतर गोलमध्ये करता आलं नाही. केनकडून गोल करण्याची ही हुकलेली संधी सामन्यानंतरही समाजमाध्यमांवरही चांगलीच चर्चेत राहीली. अल बाएत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा चौथा आणि शेवटचा संघ फ्रान्स असेल हे निश्चित झालं.

नक्की वाचा >> नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मोरोक्कोने पोर्तुगालला १-० असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वीच शूटआऊटमध्ये नेदरलँड्सला नमवत अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तसेच गतउपविजेत्या क्रोएशियाकडून पेनल्टी शूटउटमध्ये पराभव पत्करावा लागल्याने ब्राझीलचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून क्रोएशियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीमध्ये अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरक्को असे सामने रंगणार असून या दोन्ही सामन्यामधील विजेता संघ १८ तारखेला अंतिम सामन्यात जेतेपदासाठी आमने-सामने असतील.

Story img Loader