अर रायन : जिगरबाज कोरियाचा कडवा प्रतिकार ३-२ असा मोडून काढत घानाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. येथील एज्युकेशन नॅशनल स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात कोरियन संघाचा प्रतिकार मोडून काढताना घानाच्या खेळाडूंची कसोटी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमालीचा आक्रमक खेळ करणाऱ्या घाना संघाकडून मोहम्मद सालिसु (२४वे मिनिट) आणि मोहम्मद कुडुस (३४, ६८वे मिनिट), कोरियाकडून चो गुए सुंगने (५८, ६१वे मिनिट) दोन गोल केले.

घाना संघाने विजय मिळविला असला, तरी कोरियाच्या खेळाडूंनी त्यांना अखेरच्या मिनिटापर्यंत झुंजवले. सामन्याच्या अखेरच्या १० मिनिटांच्या भरपाई वेळेतील कोरियाची आक्रमणे घानाच्या बचाव फळीवर नुसतीच दडपण आणणारी नाही, तर त्यांची धडधड वाढवणारी होती. मात्र, कोरियाला बरोबरी साधण्यात अपयश आले.

सामन्याच्या पूर्वार्धात जॉर्डन आयुच्या खेळाने घानाचे वर्चस्व राहिले. गोल करण्याच्या संधी निर्माण करणाऱ्या आयुच्या पासवर २४व्या मिनिटाला सालिसु, तर ३४व्या मिनिटाला कुडुसने गोल नोंदवून घानाला मध्यंतरापर्यंत २-० असे आघाडीवर कायम राखले होते. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 ghana vs south korea ghana beats south korea zws