पहिल्या पेनल्टीवर गोल केल्यानंतर हॅरी केनची दुसरी पेनल्टी हुकली, त्यामुळे इंग्लंडच्या विश्वचषकाच्या आशाही धुळीला मिळाल्या. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी या स्टार स्ट्रायकरला साथ दिली. या विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्स २-१ ने आघाडीवर असताना खेळाच्या ८४व्या मिनिटाला इंग्लंडला बरोबरी साधण्याची संधी होती, पण पेनल्टीवर केनचा फटका क्रॉसबारवर गेला. यासह उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर काइलीन एमबाप्पेने केनने केलेल्या चुकीचा जल्लौष केला.हे पाहून इंग्लंडचे खेळाडू आणि समर्थक थक्क झाले. स्वत: केनला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता की, त्याने किती मोठी चूक केली आहे. त्याने शर्टाने चेहरा झाकून घेतला. इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र केनला पाठिंबा दिला आणि सांगितले की, या स्ट्रायकरने दु:खी होण्याची गरज नाही. कारण त्याच्यामुळेच संघ इथपर्यंत पोहोचला आहे.

इंग्लंडचा मिडफिल्डर जॉर्डन हेंडरसन म्हणाला की, हॅरीने पेनल्टीवर आमच्यासाठी किती गोल केले, हे आम्हाला माहीत आहे. या सामन्यातील पहिल्या पेनल्टीचेही त्याने गोलमध्ये रुपांतर केले. आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.” तो पुढे म्हणाला, “तो एक जागतिक दर्जाचा स्ट्रायकर आणि आमचा कर्णधार आहे. तो नसता तर आम्ही इथेही नसतो.”

केनने चालू विश्वचषक स्पर्धेत पाच सामन्यांत दोन गोल केले आहेत. फ्रान्सविरुद्धचा गोल हा त्याचा इंग्लंडसाठी ५३वा गोल होता, ज्याने वेन रुनीच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली आहे.

हेही वाचा – Video: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न भंगताच अश्रू अनावर; तो कधीच विश्वचषक ट्रॉफी उचलू शकणार नाही का?

इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट म्हणाले, “त्याने आमच्यासाठी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या पेनल्टी परिस्थितीत तो आमचा सर्वात विश्वासार्ह खेळाडू आहे. त्याने केलेल्या गोलांच्या संख्येशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.” केनच्या चुकीमुळे, फ्रान्सने हा सामना २-१ ने जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला जिथे त्यांचा सामना मोरोक्कोशी होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 harry kanes penalty kick shatters englands world cup dream watch video vbm
Show comments