कतार फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना दमदार होता. चढ-उताराच्या सामन्याचा क्लायमॅक्स जोरदार होता आणि अखेर अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. जगभरातील चाहते या सुपरहिट सामन्याचे साक्षीदार बनले. यावेळी फिफा वर्ल्डकपने भारतात एक अप्रतिम विक्रम केला. विशेषत: अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्या हा एक विक्रम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी, १८ डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात मेस्सीच्या संघाने पूर्वार्धात सुरुवातीचे दोन गोल नोंदवून आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या ८०व्या आणि ८२व्या मिनिटाला एमबाप्पेने एकापाठोपाठ दोन गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. यानंतर प्रथम एमबाप्पे आणि नंतर मेस्सीने अतिरिक्त वेळेत गोल केला. स्कोअर पुन्हा बरोबरीत आल्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. येथे अर्जेंटिनाने ४-२ असा सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.

वायाकॉम स्पोर्ट्स18 कडे फिफा वर्ल्ड टेलिकास्ट करण्याचे अधिकार होते. सर्व सामने अतिशय जबरदस्त पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणले गेले. याशिवाय, सर्व ६४ सामने जिओ सिनेमावर भारतात लाइव्ह पाहण्यात आले. डिजिटल व्ह्यूअरशिपच्या बाबतीत, फिफा विश्वचषकादरम्यान ११० दशलक्षाहून अधिक लोकांनी सामने पाहिले.

चित्तथरारक फिफा विश्वचषक फायनलबद्दल बोलायचे, तर हा एकच सामना पाहणाऱ्यांच्या संख्येने विक्रम केला आहे. ज्याचे आकडे समोर आले आहेत. त्यावरून देशातील फुटबॉलच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येईल. स्पोर्ट्स18 आणि जियो सिनेमावरील अंतिम सामन्याला प्रति मिनिट ४० अब्ज दर्शक मिळाले. एवढेच नाही तर फिफा विश्वचषक पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात अॅप डाउनलोड केले.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: मेस्सीच्या गोलमुळे ‘या’ कंपनीचे शेअर्स भिडले गगनाला, फिफा दरम्यान स्टॉकला आले रॉकेटचे स्वरुप

फिफा विश्वचषक प्रथमच मध्य पूर्व मध्ये प्रसारित –

जियो सिनेमा हे फ्री-टू-डाउनलोड अॅप फिफा विश्वचषक सुरू झाल्यापासून गेल्या तीन आठवड्यांत सर्वाधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. प्रथमच, फिफा विश्वचषकातील सर्व ६४ सामने मध्य पूर्वमध्ये थेट प्रक्षेपित करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 has broken all records in india with so many people watching the fra vs arg final match vbm