इराणमध्ये २२ वर्षीय महिला महसा अमिनीच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही उमटले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी दोनही संघ मैदानावर राष्ट्रगीत गातात. मात्र, इराण सरकार विरोधातील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी इराणच्या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. इराणचे सर्व खेळाडू राष्ट्रगीताला केवळ उभे राहिले. मात्र आता या कृतीसाठी इराणच्या संघातील सर्व खेळाडूंबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की पाहा >> ‘अल्लाह… अल्लाह… अल्लाह…’ सौदी अरेबियाच्या मिडफिल्डरचा मॅच डिसायडर Goal पाहून कॉमेंटेटरच झाला बेभान; पाहा Video

दोहा येथील खलिफा मैदानात झालेल्या सामन्यामधील इराणच्या पुरुष संघाची ही कृती जगभरामध्ये चर्चेत राहिली. इराणच्या चाहत्यांनीही त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष मैदानामध्येही कौतुक केलं. इराणच्या चाहत्यांनी हातामध्ये “इराणचे स्वातंत्र्य” आणि “महिला, आयुष्य, स्वातंत्र्य” असा मजकूर असलेले फलक पकडले होते. देशामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चाहत्यांनी हे फलक पकडले होते.

नक्की वाचा >> FIFA World Cup: अनपेक्षितरित्या सामना जिंकल्याने ‘या’ देशात आज राष्ट्रीय सुट्टी; सरकारी, खासगी कार्यालये, शेअर बाजारही बंद

अमिनीचा सप्टेंबर महिन्यात झालेल्या मृत्यूनंतर सुरु झालेलं आंदोलन अधिक हिंसक झाल्याचं पहायला मिळत आहे. इराणमधील मोरॅलिटी पोलीसांनी महसाला हिजाब योग्य पद्धीने परिधान न केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. महसाला बेदम मारहाण झाल्याचा आणि तिच्या शरीरावर अनेक मारहाणीच्या खूणा असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर केला होता. मात्र इराणमधील प्रशासनाने आणि सरकारी यंत्रणेनं हे दावे फेटाळून लावले. याचवरुन इराणमध्ये महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष सुरु आहे. याच संघर्षामध्ये आंदोलनकर्त्यांना इराणच्या फुटबॉल संघाने समर्थन दिलं. काहीही न बोलता इराणचे खेळाडू आपल्याच देशातील सरकारविरुद्ध बरंच काही बोलून गेले आणि त्याची दखल जगाने घेतली.

नक्की पाहा >> FIFA World Cup: एमबाप्पेचा भन्नाट हेडर अन् Goal..!!! Video झाला Viral; दमदार पुनरागमन करत फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला लोळवलं

अल्बानी विद्यापिठामधील आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवाधिकार विषयाचे प्राध्यापक डेव्हीड इ. गुईन यांनी या घडलेल्या प्रकारासंदर्भात न्यूजवीकला मुलाखत दिली. इराणच्या फुटबॉल संघाने देशाचं राष्ट्रगीत न गायल्याने त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही इराणमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त करम्यात आली आहे. “या खेळाडूंना परिणामांना सामोरं जावं लागेल. याप्रकरणात त्यांना अटकही होऊ शकते,” असं गुईन म्हणाले.

तसेच, “इराणमधील सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी होणारी आंदोलने चिरडून टाकताना दाखवलेली निष्ठुरता यापूर्वी जगाने पाहिली आहे. सध्या लोकांचा या खेळाडूंना पाठींबा असल्याने तात्पुरत्या स्वरुपात त्यांना कोणताही धोका नाही. खास करुन ते विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळत असेपर्यंत त्यांना सत्ताधाऱ्यांकडून कोणताही धोका नाही. मात्र नंतर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. कोणत्याही खेळाडूने स्वत:च्या खासगी स्तरावर पुढे येऊन अशाप्रकारे विरोध करणं परवडणारं नाही,” असं गुईन म्हणाले.

नक्की पाहा >> Video: सामन्याच्या १० व्या मिनिटाला मेस्सीने केलेला अप्रतिम गोल पाहिलात का? FIFA World Cup मध्ये नोंदवला विक्रम

ती सामना पाहण्यासाठी आली…
सामना पाहण्यासाठी ‘ती’चा कतारपर्यंत प्रवास इराणमध्ये महिलांना पुरुषांचे फुटबॉल सामने पाहण्यास बंदी आहे. पण इराणच्या मरियमला फुटबॉलच्या प्रेमाने कतारपर्यंत खेचून आणले. इराणचा पहिला सामना पाहण्यासाठी मरियम तेहरानवरून कतारला आली. सामना प्रत्यक्ष मैदानावर पाहून तिचे भामन हरपून गेले. आजपर्यंत मी फुटबॉलचा सामना स्टेडियमवर जाऊन पाहिला नव्हता. आयुष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी मी ही संधी साधली, अशी प्रतिक्रिया मरियमने दिली. मारियमवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader