FIFA World Cup 2022 Leo Messi Goal Video: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मधील तिसरा सामन्याच्या दहाव्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने पेनल्टीवर गोल करत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> FIFA World Cup च्या पहिल्याच दिवशी अंबानींच्या Jio ला मागावी लागली माफी! चाहते म्हणाले, “तुमच्यापेक्षा ‘सोनी’ने…”; जाणून घ्या घडलं काय

क गटामधील अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया सामन्याची नऊ मिनिटं पूर्ण होत असतानाच अर्जेंटिना संघाला पेनल्टी मिळाली. या संधीचं सोनं करत मेस्सीने अगदी अलगद चेंडू गोल पोस्टमध्ये धाडला आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरु केला. पेनल्टीसाठी पंचांनी शिट्टी वाजवताच मेस्सीने गोलकीपरच्या उजवीकडून चेंडू मारला. मात्र मेस्सीने मारलेला शॉट इतका सुंदर होता की गोलकीपर बॉलपर्यंत पोहोचण्याआधीच चेंडू गोल पोस्टमध्ये विसावला होता. या गोलमुळे मिळालेली आघाडी अर्जेंटिनाने सामन्यातील ४८ व्या मिनिटापर्यंत टिकवून ठेवली होती. नंतर ४८ व्या मिनिटाला आणि ५३ व्या मिनिटाला एका मागोमाग एक असे दोन गोल करत सौदी अरेबियाने आघाडी मिळवली.

नक्की वाचा >> …म्हणून FIFA World Cup वर भारताने तसेच कतारला जाणाऱ्या भारतीयांनी बहिष्कार टाकावा; भाजपा प्रवक्त्याची मागणी

अनोखा विक्रम
या गोलसहीत मेस्सीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. कोणत्याही चार विश्वचषकांमध्ये आपल्या नावावर गोलची नोंद करणारा मेस्सी हा पहिला अर्जेंटिनियन खेळाडू ठरला आहे. मेस्सीने यापूर्वी २००६, २०१४, २०१८ च्या विश्वचषकांमध्येही गोल्स केले आहेत. यंदाचा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात गोलची नोंद करत त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे करुन घेतला आहे.

नक्की पाहा >> FIFA 2022: सौदी अरेबिया विरुद्धच्या सामन्यात ‘Golden Boot’ घालून मैदानात 

मेस्सीच्या यंदाच्या विश्वचषकामधील पहिल्या गोलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही पाहा मेस्सीने केलेला हा भन्नाट गोल…

१)

२)

३)

४)

५)

३६ सामने अपराजित
तारांकित खेळाडू असलेला लिओनेल मेस्सी नेतृत्व करत असलेल्या अर्जेटिनाच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्यामध्येही दमदार कामगिरी केली होती. आठवडाभरापूर्वी झालेल्या अंतिम सराव सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर मेस्सीच्या संघाने ५-० असा विजय मिळवला होता. विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेला अर्जेटिनाचा संघ आजच्या सौदी अरेबियाच्या सामन्याच्या पूर्वी खेळवण्यात आलेल्या ३६ सामन्यांत अपराजित आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 leo messi scores from spot in argentina vs saudi arabia match watch video scsg