कतारमध्ये खेळली जात असलेली फिफा विश्वचषक २०२२ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ज्यामुळे या स्पर्धेतील रोमांच अधिकच वाढला आहे. या स्पर्धेत लिओनेल मेस्सीची जादू पुरेपूर दिसून येत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला त्याने अंतिम फेरीत नेले आहे. आता मेस्सी आणि त्याचा संघ चॅम्पियन होण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. त्यांचा अंतिम सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या फ्रान्सशी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता खेळवला जाईल. पण त्याआधी मेस्सीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक, अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्याचा दावा करणाऱ्या मेस्सीशी संबंधित असे दोन विचित्र योगायोग समोर येत आहेत. एक योगायोग, आम्ही तुम्हाला ग्रुप स्टेज दरम्यान आधीच सांगितले होते. जो पेनल्टीबाबत हा अजब योगायोग घडला आहे. पण आता मेस्सीच्या क्लब टीम पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) सोबत एक वेगळा योगायोग घडत आहे. अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठल्याने हा योगायोग अधिक दृढ होताना दिसत आहे. जाणून घेऊया काय आहेत हे दोन योगायोग

पहिला अजब योगायोग: पेनल्टीबाबत बनला –

या विश्वचषक स्पर्धेतील क गटातील शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाने २-० असा पराभव केला. या तिसर्‍या सामन्यात लिओनेल मेस्सीला पेनल्टीची संधी मिळाली, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. मेस्सी हा जगातील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, तो त्याच्या संघातील सर्वात अनुभवी आणि स्टार खेळाडू आहे. अशाच प्रकारे अर्जेंटिनाचा प्रवास १९७८ आणि १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत होता.

हेही वाचा – Football World Cup: मोठी बातमी! लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा, फायनल ठरणार अंतिम सामना

त्यानंतर अर्जेंटिनाच्या तिसऱ्या सामन्यात मारियो केम्पेस (१९७८) आणि दिएगो मॅराडोना (१९८६) या दोन स्टार खेळाडूंनीही पेनल्टीची संधी गमावली होती. यानंतर (१९७८, १९८६) अर्जेंटिनाने विजेतेपदावर कब्जा केला होता. यावेळीही तिसर्‍या सामन्यात मेस्सी पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरला आहे.

अर्जेंटिनासाठी हा अजब योगायोग घडला –

१९७८: तिसऱ्या सामन्यात मारिओ केम्पेसची पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी – अर्जेंटिना अंतिम फेरीत चॅम्पियन
१९८६: तिसऱ्या सामन्यात मॅराडोनाची पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी – अर्जेंटिना अंतिम फेरीत चॅम्पियन
२०२२: लिओनेल मेस्सीने तिसऱ्या सामन्यात पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी – अर्जेंटिना संघाचा प्रवास सुरूच

दुसरा योगायोग: पीएसजी क्लबशी संबंधित –

फ्रान्सच्या पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) शी संबंधित हा अजब योगायोग २१ व्या शतकापासून सुरू झाला आहे. सर्वप्रथम, ब्राझीलचा अनुभवी खेळाडू रोनाल्डिन्हो २००१ मध्ये या पीएसजी क्लबमध्ये सामील झाला. पुढच्याच वर्षी म्हणजे २००२ मध्ये त्याने ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिला.

रोनाल्डिन्हो नंतर, फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे २०१७ मध्ये पीएसजी मध्ये सामील झाला. मग काय, पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये त्याने आपल्या फ्रान्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. असाच योगायोग मेस्सीच्या बाबतीत घडत आहे. मेस्सी २०२१ मध्ये पीएसजी क्लबमध्येही सामील झाला होता आणि आता त्याचा संघही फायनलमध्ये पोहोचला आहे. म्हणजेच हा योगायोगही मेस्सी जेतेपद पटकावू शकतो याचे पूर्ण संकेत देत आहे.

मेस्सीची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असेल –

३५ वर्षीय मेस्सीचे हे शेवटचे विश्वचषक विजेतेपद असू शकते. खुद्द मेस्सीनेही याचे संकेत दिले आहेत. उपांत्य फेरीत क्रोएशियाला पराभूत केल्यानंतर मेस्सीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘मी खूप आनंदी आहे. तसेच अंतिम सामन्यात शेवटचा सामना खेळून मी विश्वचषकातील माझा प्रवासही संपवत आहे. पुढचा विश्वचषक व्हायला अजून बराच अवधी आहे. मला वाटत नाही की, मी तो खेळू शकेन. मला वाटते की इथेच संपवणे चांगले होईल.

हेही वाचा – विश्लेषण: अर्जेंटिनासाठी ‘मेसी मॅजिक’ अजूनही निर्णायक… मेसीला थोपवणे शक्य आहे का?

वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक ११ गोल करणारा मेस्सी हा अर्जेंटिनाचा पहिला खेळाडू ठरला आहे. यावर मेस्सी म्हणाला, ‘सगळं ठीक आहे आणि चांगलं आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाचे ध्येय गाठणे. आमच्यासाठी ही सर्वोत्तम आणि सुंदर गोष्ट आहे. कठोर परिश्रम केल्यानंतर, आम्ही आता फक्त एक पाऊल दूर आहोत. आता आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आपले सर्वस्व (सर्वोत्तम) देणार आहोत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 lionel messis argentina team are likely to be the winners as two coincidences testify vbm