फिफा विश्वचषकाची २०२२ हा खरोखरच इतर विश्वचषकाच्या तुलनेत वेगळा मानला जाईल. याचे प्रमुख कारण म्हणजे जर्मनी, अर्जेंटिना यांसारख्या बलाढ्य संघांना हरवत जपान आणि सौदी अरेबियासारख्या देशांनी अपसेट केले. सध्या राउंड ३२ मधील साखळी सामने सुरु आहेत. प्रत्येक संघाने किमान दोन सामने आतापर्यतच्या विश्वचषकात खेळले आहेत. हे जरी सुरवातीचे काही दिवसातील क्षण असतील तरी देखील असे म्हणायला वाव आहे की यात अजून बरेच काही घडू शकते. २७ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या सामन्यात गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आहे याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
गोल्डन बूटच्या शर्यतीत कोणताही मोठा खेळाडू जे फेवरेट समजले जातात त्यातील एकही सध्या सर्वोतम दोन मध्ये नाही. त्यामुळे इथे सुद्धा सात दिवसाच्या खेळत एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मेस्सीशिवाय फ्रान्सचा केलियन एमबाप्पेही या शर्यतीत आहे. कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये जगातील अनेक दिग्गज फुटबॉलपटू सहभागी होत आहेत.
जर्मनीच्या थॉमस मुलरने चार विश्वचषकांमध्ये एकूण १० गोल केले आहेत. कतारमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंपैकी तो एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर १० गोल आहेत. २०१० पासून तो विश्वचषकात सहभागी होत आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसच्या नावावर आहे, त्याने चार आवृत्त्यांमध्ये १६ गोल केले आहेत.
गोल्डन बूटच्या शर्यतीत व्हॅलेन्सिया आघाडीवर आहे
फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा २००६ मध्ये पहिला गोल केल्यानंतर सलग पाच विश्वचषकांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. कतारमध्ये घानाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात स्ट्रायकरने पहिला गोल केला. रोनाल्डोच्या नावावर आतापर्यंत आठ गोल आहेत. कतार २०२२ मध्ये, गोल्डन बूट रेसमध्ये इक्वेडोरच्या एनर व्हॅलेन्सिया आघाडीवर आहे. तर फ्रान्सचा किलियन एमबाप्पेही तिघांसह संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.
नुकताच मेस्सीच्या गोल्डन बूटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चॅम्पियन्स लीगच्या अधिकृत हँडलने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मेस्सीचे वर्ल्ड कप बूट्स.’ जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी हे छायाचित्र शेअर करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मेस्सीच्या शूजचा एक कोलाज चित्रात दिसू शकतो, ज्यामध्ये त्याच्या मुलांची जन्मतारीख विशेषतः सोनेरी शूजमध्ये दिसू शकते.