दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली असून बुधवारी क-गटाच्या लढतीत अर्जेटिना आणि पोलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. तसेच या सामन्यात अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी आणि पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोवस्की या तारांकित आघाडीपटूंच्या कामगिरीकडे सर्वाची नजर असेल.

अर्जेटिनाला यंदा विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांना सलामीच्या लढतीत सौदी अरेबियाने १-२ असा पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, या धक्क्यातून सावरत अर्जेटिनाने दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोवर २-० अशी मात केली आणि विश्वचषकातील आव्हान कायम ठेवले. अर्जेटिनाला सर्वाधिक गरज असताना मेसीने आपला खेळ उंचावला. अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या मेसीने एक गोल आणि एक गोलसाहाय्य करत अर्जेटिनाला मेक्सिकोविरुद्ध विजय मिळवून दिला. मात्र, पोलंडविरुद्धही त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करणे गरजेचे आहे.

New Zealand vs India first test match predict rain sport news
भारताचेच पारडे जड; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Babar Azam, Pakistan batsman Babar Azam,
विश्लेषण : एके काळी सर्वोत्तम, आता गच्छंती… पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमवर अशी वेळ का आली?
IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
Pakistan Drop Babar Azam Shahen Shah Afridi and Naseem Shah For Last Two Tests Against England PAK vs ENG Test
PAK vs ENG: बाबर आझमची इंग्लंडविरूद्धच्या कसोटी संघातून हकालपट्टी, बाबरसह अनेक स्टार खेळाडूंना दिला डच्चू, कसा आहे नवा संघ?
PAK vs ENG Chris Woakes on Pakistan Team
PAK vs ENG : इंग्लंडच्या गोलंदाजाने विजयानंतर पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘आता खेळपट्टीत बदल केले जातील…’
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा

दुसरीकडे, पोलंडला पहिल्या साखळी सामन्यात मेक्सिकोविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या सामन्यात लेवांडोवस्कीने पेनल्टीची संधी वाया घालवली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात लेवांडोवस्कीच्या गोलमुळेच पोलंडने सौदीचा २-० असा पराभव केला. आता पोलंडला अर्जेटिनाचा बचाव भेदायचा असल्यास लेवांडोवस्कीला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.