तळीरामांचे कुठे डोके चालेल काही सांगता येत नाही. ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण या घटनेवर तंतोतंत लागू पडते. कतारमध्ये संपूर्ण फुटबॉल विश्वचषकात दारूवर बंदी असताना एका पठ्याने त्यावर तोडगा काढला आहे. जगात सर्वत्र जरी दारूवर बंदी घातली तरीदेखील हे कुठूनही त्यावर क्लुप्ती काढल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच काहीसं कतारमधील फिफा विश्वचषकात एक अजब प्रकार घडला आहे. मेक्सिको विरुद्ध पोलंड या सामन्यात मेक्सिकोच्या एका चाहत्याने वेगळीच करामत करत दुर्बिणीत लपवून स्टेडीयममध्ये दारू घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिफा विश्वचषकाच्या प्रमुखांनी, गेल्या आठवड्यात, रविवारी पहिल्या सामन्याच्या ४८ तास आधीचं कतारमधील स्टेडियमच्या आसपासच्या बिअर विक्रीवर बंदी घातली. इस्लामिक राष्ट्रामध्ये दारूवर मोठ्या प्रमाणात बंदी आहे. आयोजकांनी तरीदेखील याआधी असे काही जाहीर केले नव्हते. मात्र त्यांच्या नाट्यमयरित्या उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये रोष निर्माण झाला. फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था फिफाने सांगितले की, यजमानांशी चर्चा केल्यानंतर विश्वचषकातील आठपैकी कोणत्याही स्टेडियमच्या आसपास चाहत्यांना बिअर विकत मिळणार नाही. कतारच्या फिफा विश्वचषक २०२२ स्टेडियमच्या परिमितीमधून बिअरच्या विक्रीचे ठिकाण काढून टाकले जातील आणि फॅन झोन तसेच परवानाकृत ठिकाणांवरच्या बिअर विक्रीवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यात म्हटले आहे.

काही चाहत्यांसाठी ही बातमी खळबळजनक ठरली. तथापि, काही अलौकिक चाहत्यांसाठी, त्या निर्णयाचा त्यांची नाविन्यपूर्ण अर्थ लावत अनोखी बाजू समोर आणणे होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक सुरक्षा रक्षक चाहत्याच्या दुर्बिणीची तपासणी करताना दिसत आहे. गार्ड प्रथम दुर्बिणीतून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर लेन्सचे स्क्रू काढतो. त्यात खरोखर द्रवपदार्थांसाठी कंटेनर आहे का हे शोधण्यासाठी सुरक्षारक्षक त्याची तपासणी करतो. चाहता, त्याच्या बाजूने तो फक्त हँड सॅनिटायझर घेऊन जात असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

फिफाच्या अधिकार्‍यांनी स्टेडियममध्ये अल्कोहोलवर बंदी घालण्याच्या आश्चर्यकारक निर्णयाचे कोणतेही कारण दिलेले नाही परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये कतारच्या सत्ताधारी कुटुंबाने हस्तक्षेप केला असल्याचे म्हटले आहे. विश्वचषकाच्या प्रमुखांनी शुक्रवारी कतारमधील स्टेडियमच्या आसपासच्या बिअर विक्रीवर रविवारच्या पहिल्या सामन्याच्या अवघ्या ४८ तासांपूर्वी जबरदस्त यू-टर्न घेत बंदी घातली.

हेही वाचा :   Dinesh Karthik: “विश्वचषक स्वप्न…”, कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत! इंस्टाग्राम video व्हायरल

फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी शनिवारी सांगितले की, स्टेडियमच्या आसपास विक्रीवर बंदी घातल्यानंतरही विश्वचषक चाहते दिवसातून तीन तास बिअरशिवाय जगू शकतात. “मला वैयक्तिकरित्या वाटते की जर तुम्ही दिवसातून तीन तास बिअर पिऊ शकत नसाल तरी देखील तुम्ही जगू शकाल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 qatar world cup to use binoculars for drinking in stadium watch the video avw