फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत स्पेनच्या सुपर १६ राउंडमधून बाहेर पडला आहे. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक लुईस एनरिक यांना पहिला धक्का देण्यात आला आहे. एनरिक यांची राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्पेनने त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, परंतु त्यांनी शेवटचा गट सामना गमावला. सुपर १६ च्या फेरीत मोरोक्कोकडून पेनल्टीवर पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला.
स्पेनच्या फुटबॉल फेडरेशन आरएफईएफने अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे. एनरिकच्या जागी, २१ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक, लुईस दे ला फुएन्टे हे सध्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असतील. स्पेनच्या राष्ट्रीय संघाच्या भविष्यासाठी नवीन प्रकल्पावर काम करावे लागणार असून त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. असेही अधिकृत निवेदनात म्हटले आहे. वृत्तानुसार, महासंघाच्या अंतर्गत बैठकीत एनरिकने स्वतः संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी चाहत्यांना २०१० मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाकडून मोठ्या आशा होत्या. या संघाने ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यात कोस्टा रिकाचा ७-० असा पराभव करून आपली दावेदारी मजबूत केली. पण दुस-या सामन्यात जर्मनीसोबत बरोबरी साधली. तर ग्रुप स्टेजच्या तिसर्या सामन्यात जपानने स्पेनला हरवून चकित केले. स्पेनच्या संघाला कोस्टा रिकाविरुद्ध केलेल्या ७ गोलमुळे चांगल्या गोल फरकाच्या आधारे अंतिम-१६ मध्ये स्थान मिळाले होते.
राऊंड ऑफ १६ मध्ये, स्पेनने मोरोक्कन संघाविरुद्ध ७५ टक्के वेळ चेंडू राखून ठेवला, परंतु संघाला एकही गोल करता आला नाही. मोरोक्कोने प्रथम स्पेनला गोलरहित बरोबरीत रोखले आणि नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा ३-० असा पराभव केला. स्पेनच्या संघासाठीही हे धक्कादायक होते. कारण वृत्तानुसार, लुईने संघाला एक हजाराहून अधिक वेळा स्पर्धेची तयारी करायला लावली होती, परंतु मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात त्याच्या निवडलेल्या तिन्ही खेळाडूंना चेंडू गोलपोस्टमध्ये टाकता आला नाही.
स्पेनच्या निराशाजनक पराभवानंतर, लुईसने स्वतःच कबूल केले की आपली चूक होती. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच लुईस एनरिकच्या संघ निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याने संघात रामोस, डी गाया, थियागो या खेळाडूंची निवड केली नव्हती.