FIFA World Cup 2022: कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) सुरू असून, स्पर्धेत रोमांचक सामने सातत्याने पाहायला मिळत आहेत. सध्या राउंड-16 चे सामने सुरु आहेत. आतापर्यंत ब्राझीलसहित अनेक संघांनी स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. ब्राझील संघाने फिफा विश्वचषक २०२२ च्या सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून राऊंड-16 मध्ये आपले स्थान पक्के केले होते. ग्रुप जी मध्येही सध्या ब्राझील अव्वल आहे. तर आज मध्यरात्री म्हणजेच रात्री १२.३० वाजता ब्राझीलचा जी गटातील साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना कॅमेरूनशी होणार आहे.
तत्पूर्वी ब्राझील फुटबॉल संघाच्या समर्थकांसाठी ब्राझीलच्या एका मॉडेलने मोठी घोषणा केली आहे. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये ब्राझील संघाच्या प्रत्येक गोल केल्यावर ती एक टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याचे सांगितले आहे. डायने टोमाझोनी (Daiane Tomazoni) असे या मॉडेलचे नाव आहे. ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर डायने एक अर्धनग्न फोटो शेअर करणार असल्याचे समजताच अनेकजण तिचे इंस्टाग्राम अकाउंट शोधत आहेत. डायनेने सांगितले की ती केवळ फॉलोवर्ससाठीच टॉपलेस फोटो शेअर करणार आहे.
डायने टोमाझोनी कोण आहे?
२४ वर्षीय डायने टोमाझोनी इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. यंदाचा फिफा विश्वचषक ब्राझील जिंकू शकतो असेही तिचे म्हणणे आहे. डायनेचे इंस्टाग्रामवर २८ हजार फॉलोवर्स आहेत. तर तिच्या प्रत्येक पोस्ट्सवरील लाईक्स सुद्धा हजारांच्या आकड्यात आहेत.
दरम्यान अशाप्रकारे ब्राझीलच्या विजयासाठी टॉपलेस फोटो शेअर करण्याची ही डायनेची पहिलीच वेळ नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलने शेवटचा सामना जिंकल्यानंतरही डायनेने टॉपलेस फोटो शेअर केला होता.
दरम्यान ब्राझीलच्या फिफा विश्वचषक २०२२ मधील कामगिरीविषयी सांगायचं तर, ब्राझीलने त्यांच्या पहिल्या सामन्यात सर्बियाचा २-० ने पराभव केला. मात्र या सामन्यात ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार जखमी झाला होता. आजच्या सामन्यात नेमार सुद्धा सामन्यात परतण्याची शक्यता आहे.