फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ या स्पर्धेला २० नोव्हेंबर म्हणजेच रविवारपासून सुरू झाला आहे. सलामीच्या लढतीत इक्वेडोरने यजमान कतारवर २-० असा विजय मिळवला. यासाठी सर्व ३२ संघ कतारला पोहोचले आहेत. विश्वचषकाच्या एक दिवस आधी, एक फोटो जगभरात व्हायरल झाला आहे, कारण तो फोटो खूप खास आहे. या फोटोत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत.

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. दोघेही दिग्गज असून या दोघांचा हा शेवटचा विश्वचषक असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी एक खास फोटोशूट झाले आहे, ज्यामध्ये दोघे एकत्र आले.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल

लुई व्हिटॉनने प्रायोजित केलेल्या या फोटोशूटमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी एकत्र बुद्धिबळ खेळताना दिसले. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आणि या फोटोंना करोडो लाईक्स आले. इतकेच नाही तर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचाही कमेंट करणाऱ्यामध्ये समावेश होता.

हा फोटो शेअर करताना, दोन्ही खेळाडूंनी एकच कॅप्शन लिहिले, ज्यामध्ये संदेश होता की विजय ही फक्त मनाची स्थिती आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोस्ट केलेल्या फोटोला २४ तासांत सुमारे ३० दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत, तर लिओनेल मेस्सीच्या पोस्टला २५ दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा – Fifa World Cup 2022: इक्वेडोरने कतारला हरवून ९२ वर्षांनंतर मोडला ‘हा’ मोठा विक्रम; घ्या जाणून

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने रोनाल्डोच्या पोस्टवर कमेंट करताना काय फोटो आहे लिहले. कोहलीच्या या कमेंटलाही हजारो लोकांनी लाईक केले. हा फोटो किती खास आहे, हे सांगते. विराट कोहलीने अनेकदा सांगितले आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे.

Story img Loader