सध्या क्रिकेटचा टी२० विश्वचषक सुरु असून लवकरच या विश्वचषकानंतर काही दिवसातच याच महिन्यात फुटबॉलचा जगविख्यात नावाजलेला प्रतिष्ठित असा फिफा विश्वचषक सुरु होणार आहे. दरवर्षी युरोपियन देशांमध्ये होणारा फिफा विश्वचषक हा यावेळेस अरब देशांमधील एक देश कतार या देशात होणार आहे. या विश्वचषकाला २० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून १८ डिसेंबरला या विश्वचषकाचा अंतिम सामना असणार आहे. मागील फिफा विश्वचषक हा रशियामध्ये पार पडला होता आणि त्यात फ्रान्सने विजेतेपद पटकावले होते.
मात्र फिफा विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वीच हा विश्वचषक कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कतार देशाला जेव्हापासून फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आहे तेव्हापासूनच काही ना काही विषयांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच एक नवीन घटना बुंदेसलीगा फुटबॉल सामन्यादरम्यान घडली. शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी बुंदेसलीगामध्ये बायर्न म्युनिक विरुद्ध हेर्था सामना खेळला गेला. हा सामना जर्मनीची राजधानी बर्लिन शहराच्या ऑलिम्पियास्टॅडियनमध्ये खेळला गेला. हे हेर्थाचे होम ग्राउंड असून या सामन्यादरम्यान चाहत्यांनी कतार फुटबॉल विश्वचषकाला रद्द करा असे नारे देत पोस्टर झळकावले. यामागे एक विशिष्ट कारण समोर आले आहे.
बुंदेसलीगा ऑलिम्पियास्टॅडियन येथे बायर्न म्युनिक विरुद्ध हर्था बर्लिनच्या सामन्यात घरच्या चाहत्यांनी एक पोस्टर झळकावला. त्या पोस्टरमध्ये “फुटबॉलच्या ५,७६० मिनिटांसाठी १५००० मृत्यू, तुम्हाला शरम वाटते का?”, असे लिहिले होते. बुंदेसलीगामध्ये बायर्न म्युनिक विरुद्ध हेर्था सामन्यात बार्यनने ३-२ अशा फरकाने तो जिंकला.
तेथील सरकारी आकडेवारी पाहिली तर २०१० पासून ते २०१९ मध्ये कतारने आयोजनाच्या हक्कांसाठी बोली जिंकली तेव्हापासून देशात १५,०२१ मजुरांचा (जे कतारचे रहिवासी नव्हते) मृत्यू झाला आहे. तसेच, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने असा दावा केला आहे की मृत्यूच्या कारणांचा पुरेसा तपास करण्यात आलेला नाही, मृतांची खरी आकडेवारी नेमकी किती आहे ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. बुंदेसलीगा मधील घटना ही काही या सामन्यापुरतेच मर्यादित नाही, दुसरा सामना बोरूसिया डॉर्टमंड आणि व्हीएफएल बोचम सिग्नल इडुना पार्क येथे यांच्यात खेळला गेला. डॉर्टमंडचे हे होम ग्राउंड असून घरच्या चाहत्यांनी “बॉयकॉट कतार २०२२” असे पोस्टर झळकावले. हा सामना डॉर्टमंडने ३-० असा जिंकला.
बुंदेसलीगा फुटबॉल लीगमधील या दोन्ही सामन्यांतील चाहत्यांनी केलेले विरोध प्रदर्शन, बॅनरचे फोटो, पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतारमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवू नका, असा दावा अनेक आजी-माजी दिग्गज फुटबॉलपटूंनी केला आहे. मानव अधिकाराच्या अहवालानुसार कतारमध्ये कामाचे अधिक तास, आरोग्य आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, वेतन न देणे किंवा कमी देणे, मजुरांची पिळवणूक यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले होते. मागे एका वृत्तपत्राने केलेल्या चौकशीत, विश्वचषकाची तयारी सुरू झाल्यापासून ६५०० हून अधिक मजुरांचा मृत्यू झाला होता. या विश्वचषकासाठी आठ नवे स्टेडियम बांधण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशातील मजूर काम करायला कतारला आणण्यात आले होते, मात्र त्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.