चिलीने आपल्या नावाला साजेसा तिखट झटक्याचा खेळ करत विश्वचषक अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियावर विजयाने केली. चिलीने दमदार खेळ करत ३-१ असा विजय मिळवला.
अॅलेक्सी सँचेझने १२व्या मिनिटालाच गोल करत चिलीचे खाते उघडले. मध्यरक्षक चार्ल्स अरानगुइझने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून चेंडूचा ताबा मिळवत सँचेझकडे सोपवला आणि या संधीचे सोने करत सँचेझने ऑस्ट्रेलियाचा गोलरक्षक मॅट रायनला भेदत चिलीसाठी सलामीचा गोल केला. चिलीचा खेळ पाहण्यासाठी मँचेस्टर सिटी क्लबचे व्यवस्थापक मॅन्युअल पेलेग्रिनी आणि चिलीचे राष्ट्राध्यक्ष मिचेल बाचलेट हे उपस्थित होते. दोनच मिनिटांत सँचेझने चेंडू जॉर्ज ल्युइस व्हॅलडिव्हिआकडे सोपवला. त्याने अचूकतेने गोल करत चिलीला आघाडी मिळवून दिली.
ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या अनुभवी टीम काहिलने शानदार गोल करत ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. या गोलधुमाळीनंतर खेळाचा वेग मंदावला. दुसऱ्या सत्रात काहिलचे बरोबरी करण्याचा प्रयत्न सामनाधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. अतिरिक्त वेळेत जिन बेसजोरने गोल करत चिलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा