डेव्हिड व्हिलाच्या दोन शानदार गोलच्या जोरावर स्पेनने विश्वचषक सराव सामन्यात एल सॅल्व्हाडोरवर
२-० अशी मात केली. या लढतीतील विजयासह स्पेनचा संघ विजेतेपद राखण्यासाठी ब्राझीलला रवाना होणार आहे.
अॅटलेटिको माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्हिलाने ६०व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत स्पेनचे खाते उघडले. सामना संपण्यासाठी तीन मिनिटे असताना सुरेख गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विश्वचषकात स्पेनची
सलामीची लढत नेदरलॅण्ड्शी होणार
आहे.
स्पेनच्या विजयात व्हिला चमकला
डेव्हिड व्हिलाच्या दोन शानदार गोलच्या जोरावर स्पेनने विश्वचषक सराव सामन्यात एल सॅल्व्हाडोरवर २-० अशी मात केली.
First published on: 09-06-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup david villa scores twice as spain beat el salvador in final warm up