कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना आज संपन्न झाला. या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक होता यात दुमत नाही. कारण या सामन्यात किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारख्या खेळाडू यांनी रंगतदार खेळ केला. लिओनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात गेली २० वर्षे अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले. मेस्सी की एमबाप्पे हा सामना रंगेल असं वाटलं होतं, पण वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शिट्टी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहील याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली. २०१४ला विश्वचषक विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचं अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् किलियन एमबाप्पे एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा