ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेलेने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यासोबतच त्याने अंतिम फेरीत हॅट्ट्रिक केल्याबद्दल फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेचेही अभिनंदन केले. खेळाडू म्हणून विक्रमी तीन वेळा विश्वचषक जिंकणारा पेले सध्या श्वसनाच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू आणि जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांनी फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद जिंकल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. पेलेने फ्रेंच फुटबॉल स्टार किलियन एमबाप्पेचेही शानदार खेळासाठी अभिनंदन केले. खेळाडू म्हणून तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा पेले सध्या श्वसनाच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर ४-२ असा पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर आपला संदेश पोस्ट केला. अर्जेंटिना आणि फ्रान्स अतिरिक्त वेळेनंतर ३-३ ने बरोबरीत होते, त्यानंतर शूटआउटचा अवलंब करण्यात आला. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांनी फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद जिंकल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. पेलेने फ्रेंच फुटबॉल स्टार किलियन एमबाप्पेचेही शानदार खेळासाठी अभिनंदन केले. खेळाडू म्हणून तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा पेले सध्या श्वसनाच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे.

हेही वाचा: ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा

दिग्गज पेले म्हणाले, ‘फुटबॉलने आज पुन्हा एकदा रंजक पद्धतीने आपली कहाणी सांगितली. मेस्सीने पहिला विश्वचषक जिंकला, ज्याचा तो पूर्ण पात्र होता. माझा प्रिय मित्र एमबाप्पे याने अंतिम फेरीत चार गोल (पेनल्टी शूटआउटसह) केले. आमच्या खेळाच्या भवितव्यासाठी ही शानदार कामगिरी पाहणे एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नव्हते.

आणखी वाचा: विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!

या सामन्यात मेस्सीने दोन गोल केले, तर एमबाप्पेने फ्रान्ससाठी तीनही गोल केले. पेले यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचेही अभिनंदन केले आणि अर्जेंटिनाचा दिग्गज डिएगो मॅराडोना यांचे स्मरण करून आपला संदेश संपवला. पेलेने लिहिले, “अर्जेंटिनाचे अभिनंदन. डिएगो आता नक्कीच हसत असेल तो जिथे कुठे असेल तिथे त्याला नक्कीच आनंद झाला असेल.”

हेही वाचा: Pele: पेलेंना ब्राझीलबाहेर खेळण्याची परवानगी नव्हती? युरोपियन क्लबकडून का खेळू शकले नाहीत पेले?

फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील हा सामना आतापर्यंतचा सर्वात रोमांचक फायनल असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघांमधील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला, त्यानंतर ही लढत पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेली. जिथे अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup final wherever diego is peles emotional message from hospital after argentina win avw