कतारमध्ये सुरू असलेल्या २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, रविवारी, १८ डिसेंबर रोजी लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर, गतविजेत्या फ्रान्सचा अर्जेंटिनाविरुद्ध सामना होणार आहे. बुधवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री) विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा फ्रान्स (लेस ब्लूज) इतिहासातील सहावे राष्ट्र बनले. त्यांनी मोरोक्कोला २-० गोलने हरवले.
फुटबॉलच्या सर्वोत्कृष्ट मेगाइव्हेंटची फायनल ही एक महान स्पर्धा असणार आहे, कारण फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांकडे असे अनेक स्टार खेळाडू आहेत जे विश्वविजेता बनण्यासाठी आपले सर्वस्व देऊ इच्छितात. आणि अंतिम सामन्याच्या आधी, स्टार स्ट्रायकर करीम बेन्झेमाच्या रूपाने फ्रान्सला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तो स्पर्धेच्या सुरुवातीला झालेल्या दुखापती मुळे तो विश्वचषकामधून बाहेर पडला होता. आता तो दुखापतीतून सावरला असून स्पर्धेत नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत आहे.
एका अहवालानुसार, २०२२चा बॅलन डी’ओर विजेता अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी फ्रान्सच्या संघात सनसनाटी पुनरागमन करू शकतो. करीम बेन्झेमा दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकलेला असतानाही अर्जेंटिनाविरुद्धच्या फिफा २०२२ विश्वचषक अंतिम फेरीत फ्रान्स संघात सनसनाटी पुनरागमन करू शकतो. टूर्नामेंट सुरू झाल्यावर रिकव्हरीसाठी काम सुरू करण्यासाठी माद्रिदला परतलेला ३४ वर्षीय खेळाडू पूर्ण तंदुरुस्तीवर परतला आहे आणि फ्रान्सने त्याच्या बदलीची घोषणा केली नसल्यामुळे तो सामन्याच्या दिवशी संघात सहभागी होऊ शकतो.
स्पॅनिश प्रकाशन मार्का मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, स्टार फॉरवर्ड गेल्या आठवड्यापासून कोणत्याही फिटनेस समस्यांशिवाय प्रशिक्षण घेत आहे आणि फिफा विश्वचषक अंतिम सामन्यासाठी फ्रेंच संघात सामील होण्यासाठी कतारला परत जाऊ शकतो. बुधवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री) दुस-या उपांत्य फेरीत फ्रान्सने (लेस ब्ल्यूस) मोरोक्कोचा २-० असा पराभव केल्यानंतर, फ्रान्सचे व्यवस्थापक डिडिएर डेसचॅम्प्स यांना फॉक्स स्पोर्ट्सने विचारले की बेन्झेमा खरोखरच विश्वचषक स्पर्धेत परतला आहे का, परंतु मुख्य प्रशिक्षकांनी याचे उत्तर न देणे पसंत केले.
रविवारचा अंतिम सामना हा फिफा विश्वचषक स्पर्धेच्या मागील सात आवृत्त्यांमधील फ्रान्सचा चौथा सामना असेल आणि त्यांना इतिहासातील फक्त तिसरा संघ आणि ६० वर्षांतील पहिला विश्वचषक विजेतेपद मिळण्याची आशा असेल.