Video FIFA World Cup Kylian Mbappe Goal With Header in France Vs Australia: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये गतविजेता फ्रान्सचा संघ मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाने सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना फ्रान्सने ४-१ च्या फरकाने जिंकला. ड-गटातील हा पहिल्याच सामन्यात ऑलिव्हियर जिरूड, अ‍ॅड्रिन रॅबिओट आणि कायलियन एमबाप्पे यांनी केलेल्या भन्नाट गोल्समुळे पहिल्या दहा मिनिटांमध्ये १-० ने मागे पडलेल्या फ्रान्सने दमदार पुनरागमन करत विजय साकारला. पहिल्या दहा मिनिटांमध्ये क्रेग गुडविनने ऑस्ट्रेलियाला १-० ची आघाडी मिळून दिली. मात्र यानंतर फ्रान्सने पुन्हा एकही संधी ऑस्ट्रेलियन संघाला दिली नाही. उलट आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टमध्ये चार गोल दागले.

नक्की पाहा >> ‘अल्लाह… अल्लाह… अल्लाह…’ सौदी अरेबियाच्या मिडफिल्डरचा मॅच डिसायडर Goal पाहून कॉमेंटेटरच झाला बेभान; पाहा Video

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO

पहिल्या हाफमध्ये ऑलिव्हियर जिरूड, अॅड्रिन रॅबिओट यांनी फ्रान्सला २-१ ची आघाडी मिळून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये किलियन एम्बापेने भन्नाट खेळ करत आघाडी ३-१ वर नेली. एम्बापेने संघाचा तिसरा गोल नोंदवताना अप्रतिम हेडर मारला. तर चौथ्या गोलसाठी एम्बापेने जिरूडला उत्तम पास देत गोल पोस्टमध्ये चेंडू दागण्यात मोलाची कामगिरी बजावली. एम्बापे आणि जिरूडच्या जोडीनं फ्रान्ससाठी चौथ्या गोलची नोंद केली. सामन्याच्या नवव्या मिनिटाला क्रेग गुडविनने ऑस्ट्रेलियाकडून एकमेव गोल नोंदवला.

नक्की वाचा >> FIFA World Cup: अनपेक्षितरित्या सामना जिंकल्याने ‘या’ देशात आज राष्ट्रीय सुट्टी; सरकारी, खासगी कार्यालये, शेअर बाजारही बंद

सामन्यातील २७ व्या मिनिटाला रॅबिओटने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर जिरूडने ३२ व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. एम्बापेने सेकेण्ड हाफमध्ये सामन्यातील ६८ व्या मिनिटाला अप्रतिम हेडर मारला. जिरूडने या सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल ७१ व्या मिनिटाला नोंदवला. एम्बापेने मारलेला हेडर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की पाहा >> Video: सामन्याच्या १० व्या मिनिटाला मेस्सीने केलेला अप्रतिम गोल पाहिलात का? FIFA World Cup मध्ये नोंदवला विक्रम

३६ वर्षीय जिरूडने या सामन्यात दोन गोल करत आपल्या गोल्सचं अर्धशतक पूर्ण केलं. सध्या ५१ गोल्ससहीत जिरूड हा फ्रान्सच्या फुटबॉल इतिहासामध्ये सर्वाधिक गोल्स करणाऱ्या टेरी हेन्रीच्या विक्रमाशी बरोबर केली आहे.