विश्वचषकाचा महासंग्राम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन  ठेपला आहे. फुटबॉल सांघिक खेळ असला तरी दिग्गज खेळाडू दिमाखदार वैयक्तिक प्रदर्शनाच्या जोरावर विश्वचषकाचे स्वप्न साकार करतात. आपल्या संघाला आणि जगभर विखुरलेल्या चाहत्यांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवून  देण्याची जबाबदारी असणाऱ्या गोलसिताऱ्यांचा घेतलेला वेध.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मारिओ बालोटेली (इटली)- फुटबॉल खेळात जी विविध कौशल्ये आवश्यक असतात ती सगळी मारिओ बालाटोलीकडे आहेत. मात्र यापेक्षा तो चमकोगिरीसाठी ओळखला जातो. पिळदार शरीरयष्टी, दोन्ही हातांवरचे टॅटू, टक्कल आणि पृथ्वीला विषुववृत्त भेदते तशी डोक्याला भेदणारी उभी नक्षीदार शेंडी अशा विचित्र गोष्टींसाठी बालोटेली चर्चेत असतो. आक्षेपार्ह वर्तनासाठी त्याला शिक्षाही सुनावली गेली आहे. परंतु खेळण्याच्या बाबतीत वल्ली पक्का असल्याने इटली असो किंवा एसी मिलान क्लब- त्यांनी बालोटेलीला आपल्या संघात सामावून घेतले आहे. गोल करण्याची, जिंकून देण्याची आणि याहीपेक्षा जीव तोडून खेळण्याची आस हे बालोटेलीचे गुणवैशिष्टय़ आहे. इटलीला विश्वचषकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर बालोटेलीला सर्वस्वी खेळावर लक्ष केंद्रित करावे लागले.
नेयमार (ब्राझील)– काटक शरीर, केसांचा केलेला कोंबडा, त्यावर ऑलिव्हच्या पानांची रिंग, हातावर गोंदलेला टॅटू आणि सळसळणारा आत्मविश्वास या सगळ्या गुणवैशिष्टय़ांनी नेयमार सजला आहे. वेगवान खेळ  व चेंडूला गोलपोस्टमध्ये नेण्यातील चापल्य या बळावर नेयमार २२ वर्षीच सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत आहे. मेस्सीच्या बरोबरीने नेयमारने बार्सिलोनातर्फे खेळताना आपले गोलप्रभुत्व सिद्ध केले आहे. यजमानही विश्वचषक जिंकू शकतात हे जगाला दाखवून देण्याची जबाबदारी नेयमारवर आहे. ब्राझीलला नवसंजीवनी मिळवून देण्याच्या आशा नेयमारवर खिळल्या आहेत.
वेन रुनी (इंग्लंड)- इंग्लंडच्या संघाचा चेहरा. स्थूल वाटावा असा रुनी खेळायला लागला की त्याचे कौशल्य आपल्याला स्तिमित करते. मँचेस्टर युनायटेडपुरताच उपयुक्त ही ओळख पुसून टाकून इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्याची अवघड जबाबदारी रुनीच्या खांद्यावर आहे. रुनीच्या गोलक्षमतेमुळेच इंग्लंडने पात्रता फेरीचा अडथळा पार केला. १९६६ नंतर इंग्लंडला विश्वचषक पटकावता आलेला नाही. रुनीला हे इंग्लंडवासियांचे स्वप्न साकार करायचे आहे. याआधी विश्वचषकाच्या वेळी दुखापतग्रस्त झालेला रुनी यंदा मात्र तंदुरुस्त असून प्रतिस्पध्र्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
लुईस सुआरेझ (उरुग्वे)- हाताने केलेल्या गोलसाठी रेडकार्ड, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला चावणे, वंशभेदी शेरेबाजी करणे अशा चुकीच्या कारणांसाठी सुआरेझ नियमित चर्चेत असतो. मात्र सातत्याने गोल करण्याच्या क्षमतेमुळे उरुग्वे आणि लिव्हरपूल क्लब या दोन्हींसाठी तो महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. कौशल्याला शिस्त आणि सद्वर्तनाची जोड दिल्यास सुआरेझ उरुग्वेला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतो. इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत यंदाच्या हंगामात लिव्हरपूलचे प्रतिनिधित्व करताना ३० गोलसह ‘गोल्डन बूट’ किताबाचा मानकरी सुआरेझभोवती उरुग्वेचे डावपेच आधारलेले आहेत.
इडन हॅझार्ड (बेल्जियम)- रुढार्थाने जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या संघांमध्ये बेल्जियमचा समावेश नाही. परंतु धक्कादायक विजयासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. बेल्जियमची भिस्त आहे इडन हॅझार्डवर. इंग्लिश प्रीमिअर लीग हंगामात चेल्सीसाठी अफलातून कामगिरी करणारा हॅझार्ड आता देशाप्रती सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सिद्ध झाला आहे. आक्रमक मध्यरक्षणात माहिर हॅझार्ड विंगरच्या भूमिकेत असतो. वेग, चतुराई आणि चेंडूवरील जबरदस्त नियंत्रणाबरोबर सुरेख पासेस देण्यासाठी हॅझार्ड ओळखला जातो. आई-वडील आणि इडनसह तिन्ही भाऊ फुटबॉल खेळतात. अशा या फुटबॉलमय कुटुंबातल्या २३ वर्षीय इडनची सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंमध्ये गणना होते आहे.
रॉबिन व्हॅन पर्सी (नेदरलॅण्ड्स)- कलाकार आईवडिलांचा वारसा लाभलेल्या रॉबिन व्हॅन पर्सीने गोलकलाकार होण्याला पसंती दिली. फेयनुर्ड या नेदरलॅण्ड्समधील क्लबमध्ये फुटबॉलची धुळाक्षरे गिरवणाऱ्या पर्सीची जगातील सर्वोत्तम आघाडीपटूंमध्ये गणना होते. कर्णधारपदाची धुरा सांभाळताना संघातल्या अन्य खेळाडूंच्या साथीने आँरेज आर्मीला जेतेपद मिळवून देण्याचे अवघड काम व्हॅन पर्सीसमोर आहे. आयुष्यात कठीण निर्णय घेताना माझ्यात दडलेल्या लहान मुलाचे मी ऐकतो. गोष्टींचा गुंता वाढवण्यापेक्षा तो सोडवण्यावर भर देण्याचे तत्त्व जोपासणाऱ्या व्हॅन पर्सीसाठी विश्वचषक खंडप्राय आव्हान आहे. तो या आव्हानाला कसा सामोरा जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)- वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीचा फिफाचा ‘बलून डी ओर’ पुरस्कारचा ख्रिस्तियानो रोनाल्डो मानकरी आहे. दूर अंतरावरूनही अचूक अंदाज घेत गोल करण्याची हातोटी, सर्वागीण वावर आणि हवेत झेपावत थरारक खेळ करण्याची क्षमता यामुळे आधुनिक काळातील परिपूर्ण खेळाडूंमध्ये रोनाल्डोचे नाव आदराने घेतले जाते. रिअल माद्रिद क्लबसाठी त्याचा फॉर्म ही जमेची बाजू आहे. एकहाती सामना जिंकून देण्याची त्याची शैली प्रतिस्पध्र्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. रोनाल्डोच्या उपस्थितीत पोर्तुगालला अंतिम सोळाच्या पलीकडे मजल मारता आलेली नाही.
लिओनेल मेस्सी (अर्जेटिना)- फुटबॉलमध्ये क्लब का देश या प्राधान्यक्रमात क्लबला झुकते माप मिळते. क्लबसाठी अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या लिओनेल मेस्सीला देशाप्रती मात्र त्या लौकिकाची कामगिरी करता आलेली नाही. क्लबइतकीच देशासाठीही चांगली कामगिरी करून दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान मेस्सीसमोर आहे. क्लबविश्वात अद्भुत गोलकौशल्यामुळे सार्वकालीन महान खेळाडूंच्या पंक्तीत दाखल झालेल्या मेस्सीला अर्जेटिनाला विश्वचषकाच्या जेतेपदपथावर आणण्याची जबाबदारी आहे. गेल्या वर्षी मांडीच्या  दुखापतीतून तो सावरला असून, टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
मेस्यूट ओझिल (जर्मनी)- परिपूर्ण संघामुळे जर्मनीचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. ही दावेदारी पक्की होण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे मेस्यूट ओझिल. आपल्या खेळाद्वारेच बोलण्याची त्याची पद्धत वाचाळयुगात अपवादात्मक अशी आहे. २५ वर्षीय ओझिल इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत अर्सेनेलचा हुकुमी एक्का आहे. खेळातील घोटीवपणा, अचूकतेवर भर आणि सातत्याने सुधारणा करण्याच्या वृत्तीमुळे ओझिलची फ्रान्सच्या झिनेदिन झिदानशी तुलना केली जाते. तुर्कीची पाश्र्वभूमी असलेला ओझिल प्रत्येक सामन्याआधी कुराणचे पठण करतो.
आंद्रेस इनिएस्टा (स्पेन)- वेगवान आणि आक्रमक स्वरूपाच्या फुटबॉलमध्ये कलात्मक आणि शैलीदार खेळासाठी आंद्रेस इनिएस्टा ओळखला जातो. गोल करण्यापेक्षाही अन्य खेळाडूंना गोलसाहाय्य करण्यातले त्याचे नैपुण्य विलक्षण आहे. चपळ वावर, छोटय़ा छोटय़ा पासेसनी चेंडूवर नियंत्रण आणि खेळभावना जपत खेळ हे इनिएस्टाचे वैशिष्टय़ आहे. २०१० विश्वचषकात स्पेनसाठी इनिएस्टानेच निर्णायक गोल करत विश्वचषक मिळवून दिला होता. लिओनेल मेस्सी, नेयमार, अशा वलयांकित खेळाडूंचा बार्सिलोना संघात भरणा असतानाही इनिएस्टा डावपेचांचा अविभाज्य घटक आहे.