* नेदरलँड्सकडून स्पेनचा ५-१ने धुव्वा
* ५१ वर्षांनंतरचा स्पेनचा सर्वात लाजिरवाणा पराभव
* रॉबिन व्हॅन पर्सी, आर्येन रॉबेन विजयाचे शिल्पकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चार वर्षांपूर्वी स्पेनने आंद्रेस इनियेस्टाच्या गोलमुळे नेदरलँड्सच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. या पराभवानंतर गेली चार वर्षे लोकांच्या टोमण्यांना सामोरे जात नेदरलँड्सच्या खेळाडूंनी ही सल सोसली. या पराभवाचा परतफेड करण्याची सुवर्णसंधी नेदरलँड्सच्या खेळाडूंना चार वर्षांनी मिळाली आणि त्यांनी गतविजेत्या स्पेनचे अक्षरश: पानिपत केले. रॉबिन व्हॅन पर्सी आणि आर्येन रॉबेन यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर नेदरलँड्सने स्पेनचा ५-१ असा धुव्वा उडवला. ५१ वर्षांनंतर प्रथमच स्पेनला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या संघाला इतक्या दारुण पराभवाला सामोरे जाण्याची ही विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली.
स्पेनने पहिला गोल झळकावत नेदरलँड्सला पुन्हा पराभवाचा इशारा दिला, पण नियतीला मात्र वेगळेच मान्य होते. नेदरलँड्सच्या खेळाडूंना एकापाठोपाठ गोलचा धडाका लावत जगज्जेत्यांना नामोहरम केले. व्हॅन पर्सी आणि रॉबेन हे नेदरलँड्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले. स्टेफान डे व्रिज यानेही एका गोलाची भर घालत नेदरलँड्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. १९६३मध्ये स्पेनला स्कॉटलंडकडून ३-६ असे पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतरचा स्पेनचा हा सर्वात वाईट पराभव ठरला. २००२नंतर प्रथमच जगज्जेत्या संघाला पहिला सामना गमावण्याची वेळ स्पेनवर आली. ‘ब’ गटातील दुसऱ्या सामन्यात चिलीने ऑस्ट्रेलियावर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला. चिलीच्या या विजयामुळे स्पेनला पहिल्या फेरीचा अडथळा पार करणे तसेच जेतेपद कायम राखणे मुश्किल होऊन बसले आहे. स्पेनने बाद फेरी गाठली तरी त्यांच्यासमोर ब्राझीलसारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान असणार आहे.
मागील पराभवाचा वचपा काढायचाच, याच उद्देशाने नेदरलँड्स संघ मैदानात उतरला. मागील पराभवाचा वचपा काढायचाच, याच उद्देशाने नेदरलँड्स संघ मैदानात उतरला.
स्पेनच्या खेळाडूंना जाणूनबुजून धक्के देत, काहींना मैदानावर पाडत, जणू मागील पराभवाचा वचपा काढायचा हाच नेदरलँड्सच्या खेळाडूंचा उद्देश होता. याच प्रयत्नांत दिएगो कोस्टाला डे व्रिजने गोलक्षेत्रात पाडल्याप्रकरणी स्पेनला पेनल्टी-किक मिळाली. या विश्वचषकात रेफरींनी दिलेली ही दुसरी वादग्रस्त पेनल्टी ठरली. त्याचा फायदा उठवत झाबी अलोन्सोने नेदरलँड्सच्या गोलरक्षक जास्पेन सिल्लेस्सेनला चकवून डाव्या बाजूने चेंडू गोलजाळ्यात धाडला. या गोलमुळे स्पेन संघ आपल्या ‘टिकी-टाका’ खेळाच्या शैलीद्वारे सामन्यावर वर्चस्व गाजवणार, असे वाटत असतानाच व्हॅन पर्सीने पहिल्या सत्राच्या ९० सेकंदआधी भन्नाट गोल केला. डॅले ब्लाइंड याने मैदानाच्या मध्यभागातून दिलेल्या पासवर व्हॅन पर्सीने जोराने धावत येऊन हवेत झेप घेत हेडरद्वारे चेंडू स्पेनचा गोलरक्षक आयकर कॅसिल्लाच्या डोक्यावरून गोलजाळ्यात धाडला. कॅसिल्लाला काही समजण्याआधीेच हा गोल झाला होता.
दुसऱ्या सत्राच्या खेळावर नेदरलँड्सने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ५३व्या मिनिटाला ब्लाइंडकडून मिळालेल्या पासवर रॉबेनने अप्रतिमपणे चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर अप्रतिम ड्रिब्लिंगद्वारे स्पेनच्या दोन बचावपटूंना चकवून रॉबेनने गोल साकारला. ६०व्या मिनिटाला नेदरलँड्सची गोल करण्याची संधी वाया गेली. व्हॅन पर्सीने उजव्या बाजूने मारलेला फटका गोलबारच्या वरच्या भागाला लागून बाहेर गेला. पण चार मिनिटांनी डाव्या बाजूने मिळालेल्या कॉर्नरवर गोलजाळ्याच्या अगदी शेजारी उभ्या असलेल्या डे व्रिजने हेडरद्वारे गोल लगावला आणि नेदरलँड्सला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. वातावरण चांगलेच तापले असताना रेफरींनी व्हॅन पर्सीला पिवळे कार्ड दाखवले. त्यानंतर काही मिनिटांनी स्पेनच्या दिएगो कोस्टाने गोल झळकावला, पण सहाय्यक रेफरींनी तो ऑफसाईड असल्याचा कौल दिला.
रेफरींशी वाद घातल्याबद्दल कॅसिल्लाला रेफरींनी पिवळे कार्ड दाखवले. या सर्व प्रकारामुळे कसिल्लासकडून झालेली चूक नेदरलँड्सच्या पथ्यावर पडली. चेंडूवर ताबा मिळवताना कॅसिल्लाकडून चूक झाल्यानंतर व्हॅन पर्सीने त्याच्याकडून चेंडू हिरावून घेतला आणि डाव्या पायाने फटका गलावत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. या गोलमुळे नेदरलँड्सच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. ८०व्या मिनिटाला रॉबेनने स्पेनची बचावफळी भेदून पाचवा गोल झळकावला. ८७व्या मिनिटाला त्याची हॅट्ट्रिकची संधी हुकली. ९०व्या मिनिटाला स्पेनचा ‘प्लेमेकर’ फर्नाडो टोरेसने गोल करण्याची संधी वाया घालवली. गोलरक्षक गोलक्षेत्राच्या बाहेर असताना टोरेसला चेंडूवर नियंत्रण मिळवता आले नाही.