फिफा विश्वचषकाच्या इतिहासावर नजर टाकली तर ब्राझीलनंतर सर्वाधिक यशस्वी ठरलेला संघ म्हणजे जर्मनी. आतापर्यंत १८ वेळा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या जर्मनीने तब्बल आठ वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. त्यात तीन वेळा (१९५४, १९७४ आणि १९९०) विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीला चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. १५ वेळा विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या अर्जेटिनाने १९७८ आणि १९८६मध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते. १९३० आणि १९९०मध्ये अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या अर्जेटिनाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले होते.
१९५४ पश्चिम जर्मनी
‘मिरॅकल ऑफ बेर्न’ (जागतिक फुटबॉल पटलावर जर्मनीचा उदय) या नावाने हे जेतेपद ओळखले जाते. लिंबूटिंबूमध्ये गणती होणाऱ्या पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीत बलाढय़ हंगेरीवर ३-२ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. प्राथमिक फेरीत हंगेरीने पश्चिम जर्मनीचा ८-३ असा धुव्वा उडवला होता. या विजयासह पश्चिम जर्मनीने जेतेपदाचा दावेदार असलेल्या हंगेरीचे संस्थान खालसा केले.१९७४ पश्चिम जर्मनी
जेतेपदाच्या इतके समीप येऊनही संधी हुकली म्हणून या लढतीचे वर्णन केले जाते. जर्मनीने नेदरलँड्सच्या नियंत्रणातला सामना पॉल ब्रिइटनरची पेनल्टी आणि गेर्ड म्युलरच्या गोलांच्या जोरावर खेचून आणला आणि जेतेपदावर नाव कोरले.
१९७८ अर्जेटिना
१९७०च्या दशकातील सांघिक कामगिरीचे फलित म्हणजे अर्जेटिनाचे हे विश्वविजेतेपद. अंतिम लढतीत मारिओ केम्पसने दोन गोल साकारत अर्जेटिनाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अर्जेटिनाचे लष्कर स्टेडियमचा ताबा घेण्याची वेळ ओढवली होती. अर्जेटिनाने जिंकण्यासाठी अयोग्य मार्गाचा वापर केल्याचा आरोप प्रतिस्पर्धी नेदरलँड्सने केला होता.
१९८६ अर्जेटिना
दिएगो मॅराडोना या किमयागार फुटबॉलपटूचा विश्वचषक असे अर्जेटिनाच्या या विश्वविजयाचे वर्णन करावे लागेल. अंतिम लढतीत अर्जेटिनाने जर्मनीला नमवत जेतेपदावर कब्जा केला. मॅराडोनाच्या अद्भुत गोलच्या जोरावर अर्जेटिनाने पश्चिम जर्मनीवर ३-२ असा विजय मिळवला.
१९९० पश्चिम जर्मनी
विश्वविजेतेपदाचा १६ वर्षांचा दुष्काळ संपवत पश्चिम जर्मनीने अर्जेटिनावर मात करत जेतेपद पटकावले. गैरवर्तणुकीमुळे मोनझोन आणि देझोटी यांना लाल कार्ड मिळाल्याने अर्जेटिनाला नऊ खेळाडूंनिशी खेळावे लागले. पश्चिम जर्मनीतर्फे फुलबॅक आंद्रेस ब्रम्हेने केलेला एकमेव गोल जर्मनीच्या विजयात निर्णायक ठरला.
२०१४चा विजेता?
इतिहासातील सुवर्णपाने
फिफा विश्वचषकाच्या इतिहासावर नजर टाकली तर ब्राझीलनंतर सर्वाधिक यशस्वी ठरलेला संघ म्हणजे जर्मनी. आतापर्यंत १८ वेळा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या जर्मनीने तब्बल आठ वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. त्यात तीन वेळा (१९५४, १९७४ आणि १९९०) विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीला चार …
First published on: 13-07-2014 at 09:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup history of winning teams