२०१८ फिफा फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद रशियाला देण्यात आले. रशियाने सनदशीर मार्गाने यजमानपदाची प्रक्रिया पूर्ण केल्यानेच ही संधी मिळाल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले. प्रामाणिक प्रयत्नांमुळेच यजमानपद मिळाल्याने याविषयी संशय तसेच चौकशीची गरज नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
विश्वचषक आयोजन, प्रक्षेपण हक्क यासंदर्भात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्याने स्वित्र्झलड पोलिसांनी ‘फिफा’च्या चौदा पदाधिकाऱ्यांना अटक केली. २०१८ विश्वचषकाचे आयोजन रशियाला तर २०२२ चे कतारला देण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. स्टेडियमची उभारणी सुरू झाली आहे. त्यामुळे संशयाला जागा नाही, असे पुतिन म्हणाले. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास रशिया आणि कतारचे विश्वचषक आयोजन रद्द केले जाऊ शकते, असा इशारा फिफाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा