‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये फ्रान्सने मोरोक्कोचा २-० ने पराभव केल्यानंतर हिंसाचार उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. मोरोक्को संघाच्या चाहत्याचा ब्रुसेल्समध्ये पोलिसांशी झाल्याची माहिती समोर येत आहे. बेल्जियमच्या राजधानीचं शहर असलेल्या ब्रुसेल्समधील या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

१०० हून अधिक मोरक्कन संघाच्या चाहत्यांनी हा धुडगूस घातल्याचं समजतं. अंगाला मोरोक्कोचे झेंड गुंडाळून आलेल्या या चाहत्यांनी ब्रुसेल्समधील साऊथ स्टेशन इथे हा धुडगूस घातला. या चाहत्यांनी पोलिसांनीवर फटाके आणि इतर साहित्य फेकलं. दंगलनियंत्रण विभागातील पोलिसांवर हा हल्ला करण्यात आळा. या चाहत्यांनी कचऱ्याच्या पिशव्या, सामन्यासाठी बनवून आणलेले कार्डबोर्ड बॉक्स आणि इतर गोष्टीही फेकल्या. हा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा तसेच अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा करावा लागला.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

पोलिसांनी अनेक चाहत्यांना अटक केली आहे. हा गोंधळ पोलिसांनी वेळीच नियंत्रणात आणला. यामुळे कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही, असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्याचं स्वप्न भंग झाल्याने चाहते चांगलेच संतापल्याचं दिसलं.

नक्की वाचा >> FIFA World Cup मध्ये नवा वाद! ‘या’ देशाच्या खेळाडूंनी मैदानावर फडकवला पॅलेस्टाइनचा झेंडा; विजयानंतर ‘फ्री पॅलेस्टाइन’ची मागणी

फ्रान्सने थिओ हर्नांडेझ आणि रॅण्डल कोलो मौनी या दोघांनी केलेल्या गोल्सच्या जोरावर अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं. २००२ नंतर फ्रान्स हा पहिला असा संघ ठरला आहे ज्याने सलग दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी २००२ मध्ये ब्राझीलने ही कामगिरी केली होती. मोरोक्कोचा बचाव भेदण्यात फ्रान्सला पाचव्या मिनिटालाच यश आलं. यानंतर मोरोक्कोला सामन्यात पुनरागमन करताच आलं नाही. फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता १८ डिसेंबर रोजी फ्रान्स अर्जेंटिनाविरुद्ध अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरले.

फ्रान्सने पाचव्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ सुरु केला. अँटोइन ग्रिजमनने काइलियन एमबाप्पेला केले पास एमबाप्पेने डाव्या पायाने गोलपोस्टवर धाडला मात्र हा गोल वाचवण्यात मोरोक्कोला यश आलं. त्याच मिनिटाला थिओ हर्नांडेझने सहा यार्ड बॉक्समधून मारलेला चेंडू नेटच्या डाव्या कॉर्नरमध्ये जाऊन विसावला आणि २०१८ च्या विश्वविजेत्या संघास १-० ची आघाडी मिळाली. मोरोक्कोनेही अनेकदा प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही. नासेर मजरावीने अझेदिन ओनाहीला केलेला पास नेटच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात जाण्याआधीच अडवण्यात आला.

११ व्या मिनिटाला अँटोइन ग्रिजमनने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेसच काइलियन एमबाप्पेसाठी ऑफसाईडचा झेंडा पंचांनी वर केला. सामन्यातील ७९ व्या मिनिटाला फ्रान्सने दुसरा गोल केला. इंजरी टाइममध्ये मोरोक्कोने वेगवान खेळ करत २-० ची आघाडी कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र फ्रान्सपुढे त्यांचा निभाव लागला नाही. आता फ्रान्स मेस्सीच्या संघाविरोधात जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

Story img Loader