‘आता अश्रू गाळण्याची नव्हे तर विजयाश्रूंची वेळ आहे,’ अशा शब्दांत अल्जेरियाचे प्रशिक्षक वाहिद हालिहोडझिक यांनी दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीपूर्वी आपल्या खेळाडूंना संबोधित केले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या मुकाबल्यात हार झाल्यास अल्जेरियाचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात येऊ
शकते.
विश्वचषकातील सात सामन्यात विजयरहित राहण्याची परंपरा त्यांना मोडीत काढायची आहे. सलामीच्या लढतीत बेल्जियमने त्यांच्यावर मात केली होती. १९८२ विश्वचषकात जर्मनीसारख्या बलाढय़ संघाला चीतपट करण्याचा अपवाद वगळता अल्जेरियाची कहाणी उल्लेखनीय नाही. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात सोफिअन फेघौलीने केलेला गोल अल्जेरियाच्या २८ वर्षांच्या विश्वचषक इतिहासातला पहिलाच गोल ठरला.  
दुसरीकडे या सामन्यात विजय मिळवल्यास दक्षिण कोरियाचा बाद फेरीचा मार्ग सुकर होऊ शकतो. रशियाविरुद्धची लढत त्यांनी १-१ अशी बरोबरीत सोडवली. या कामगिरीने म्युंग बो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
सामना क्र. ३१
‘ह’ गट : बेल्जियम वि. रशिया
स्थळ :  इस्टाडियो मराकान, रिओ दे जानिरो

Story img Loader