विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीतच कोस्टा रिकासमोर तगडय़ा उरुग्वेचे आव्हान असणार आहे. उरुग्वेच्या सर्व आशा लुइस सुआरेझवर केंद्रित झाल्या आहेत. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेला सुआरेझ दुखापतीतून सावरत लौकिकाला साजेसा खेळ करू शकतो का, हा उरुग्वेसाठी कळीचा मुद्दा आहे. मात्र गटातील इंग्लंड आणि इटलीचे आव्हान पाहता प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ या सामन्यात सुआरेझला विश्रांती देण्याची शक्यता आहे. दिएगो फोरलॉन आणि इडिन्सन काव्हानी ही द्वयी आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. पोटाच्या दुखापतीने फोर्लानला सतवले होते. मात्र या सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात तो सहभागी झाल्याने संघ व्यवस्थापनाची चिंता मिटली आहे. ख्रिस्तियन स्टुअनी किंवा गॅस्टॉन रामिरेझ यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे कोस्टा रिकाच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र तरीही आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार ब्रायन रुईझने व्यक्त केला.
‘ड’ गट : उरुग्वे वि. कोस्टा रिका
स्थळ : इस्टाडिओ कॅसेलो
सामना क्र. ७ : कोस्टा रिकाची परीक्षा
विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीतच कोस्टा रिकासमोर तगडय़ा उरुग्वेचे आव्हान असणार आहे. उरुग्वेच्या सर्व आशा लुइस सुआरेझवर केंद्रित झाल्या आहेत.
First published on: 14-06-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup preview uruguay v costa rica