विश्वचषकाचे दावेदार म्हणून इंग्लंडचा संघ ब्राझीलमध्ये दाखल झाला असला तरी त्यांच्यावर रिक्त हस्तेच मायदेशी परतण्याची पाळी आली आहे. उरुग्वे आणि इटलीकडून पराभव झाल्यावर कोस्टा रिकाविरुद्धची लढत इंग्लंड जिंकून स्पर्धेचा शेवट तरी गोड करेल, अशी अपेक्षा होती. पण इंग्लंडला तेसुद्धा साधता आले नाही. कोस्टा रिका आणि इंग्लंड यांच्यातील लढत शून्यगोल बरोबरीत सुटली.
इंग्लंडला अखेरच्या साखळी सामन्यामध्येही छाप पाडता आली नाही. पहिल्या सत्रामध्ये कोस्टा रिकाने अप्रतिम बचाव करत इंग्लंडच्या आक्रमणपटूंना रोखण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रातही इंग्लंडने कोस्टा रिकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण कोस्टा रिकाचा बचाव अभेद्यच राहिला. सामन्याच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये वेन रूनीने जोरदार प्रयत्न केले, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. या सामन्यापूर्वीच इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडली होती, तर कोस्टा रिकाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा