गतविजेत्या स्पेनने विश्वचषकातून जाता जाता अखेर विजयाचा टिळा लावून घेतला. नेदरलँड्स आणि चिलीविरुद्धच्या सामन्यांमध्ये वस्त्रहरण झाल्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यात दुबळया
सामन्याचा पहिला अर्धा तास गोलविरहीत झाला, मग ३६व्या मिनिटाला डेव्हिड व्हिलाने अप्रतिम गोल करत स्पेनचे खाते उघडले. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये स्पेनच्या आक्रमणाला आणखी यश मिळाले
नाही.
दुसऱ्या सत्रामध्ये स्पेनच्या आक्रमणाला अधिक धार चढल्याचे दिसून आले. ६९व्या मिनिटाला फर्नाडो टोरेसने दुसरा गोल लगावत स्पेनच्या आघाडीमध्ये भर घातली, त्यानंतर ८२व्या मिनिटाला ज्युआन माटाने तिसरा गोल करत संघाची आघाडी वाढवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-06-2014 at 03:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup winning farewell for spain david villa