बेनोनी : भारताचा सामना युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियशी होणार आहे. भारताचा प्रयत्न या सामन्यात चांगली कामगिरी करीत आपले सहावे जेतेपद मिळवण्याचा राहील. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियन संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नमवीत जेतेपद मिळवले होते. त्यामुळे उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारताच्या युवा संघाचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाला नमवीत त्या पराभवाचा वचपा काढण्याचा राहील.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वेबगन, सलामीवीर हॅरी डिक्सन, वेगवान गोलंदाज टॉम स्ट्रेकर व कॅलम विडलर यांनी या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतासमोर त्यांचे आव्हान राहील. भारताच्या युवा संघाने २०१२ व २०१८च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवले होते आणि यावेळीही भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
’ वेळ : दुपारी १.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १