Asia Cup 2023 Final India Vs Sri Lanka Updates: आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी (१७ ऑक्टोबर ) होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यानंतर श्रीलंकेने सुपरफोरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट मिळवले. आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत ७ वेळा आमनेसामने आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोघांमध्ये १९८८ मध्ये पहिला फायनल सामना खेळला गेला होता. ज्यात भारताने बाजी मारली होती. या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ७ फायनलमध्ये भारताने ४ विजेतेपदे जिंकून आघाडी कायम ठेवली आहे. तसेच श्रीलंकेने भारताविरुद्ध केवळ तीन वेळा विजेतेपदाचा सामना जिंकला आहे. या दोघांमध्ये दुसरा विजेतेपदाचा सामना १९९१ मध्ये झाला होता, ज्यामध्ये भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला होता. त्यानंतर १९९५ मध्ये या दोघांमध्ये खेळलेला सामना भारताने पुन्हा जिंकला.

आधी भारताने मग श्रीलंकेने लगावलीय जेतेपदाची हॅट्ट्रिक –

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवत हॅटट्रिक केली. यानंतर १९९७, २००४ आणि २००८ मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन फायनल जिंकून हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र, यानंतर दोघांमध्ये शेवटची विजेतेपदाची लढत २०१० मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने विजय मिळवून आघाडी घेतली. आता २०२३ मध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत दोघांमध्ये बरोबरी होणार की भारत आघाडी कायम ठेवणार?

हेही वाचा – World Cup 2023: ‘कोई भी आए, देख लेंगे…’; एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सुरेश रैनाने विरोधी संघांना दिला इशारा

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीतील विजेता –

१९८८- भारत
१९९१- भारत
१९९५- भारत
१९९७- श्रीलंका
२००४- श्रीलंका
२००८- श्रीलंका
२०१०- भारत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final will be played between ind and sl in the asia cup for the 8th time know who has dominated over whom vbm