ICC worldcup2023, IND vs PAK: पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने २०२३ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येण्यास हिरवा झेंडा दाखवला आहे. भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांची स्थिती त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मार्गात येऊ नये, असे पाकिस्तानचे मत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पुरुष संघ ६ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामान्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करतील.

पाकिस्तान सरकारने परवानगी देताना म्हटले आहे की खेळ आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ते लक्षात घेऊन संघाला विश्वचषकात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानचा संघ २०१६ नंतर कोणत्याही स्पर्धेसाठी भारतात आलेला नाही. त्यामुळे तब्बल ७ वर्षानंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या निमित्ताने भारतात खेळणार आहे.  शेवटच्या वेळी पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषकात सहभागी झाला होता.

Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Moin Khan strong warning to BCCI Team India
IND vs PAK : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नाही तर…’, मोईन खानने दिला इशारा
Vinesh Phogat
Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने…”, विनेश फोगटचा गंभीर आरोप
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Mohsin Naqvi set to replace Jay Shah as ACC
जय शाहांनी ICC च्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारताच पाकिस्तानला होणार फायदा, PCB प्रमुखांना मिळणार मोठी जबाबदारी
pm modi pakistan visit
नेहरू ते मोदी; कोणकोणत्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली? तेव्हा नक्की काय घडले? पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का?
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात भारताविरोधात वक्तव्य केले आहे. त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात याबाबतीत लिहिताना म्हणतात की, “आशिया कपसाठी भारताने आपला क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला, तरीदेखील पाकिस्तानने भारताच्या हट्टी वृत्तीच्या विरूद्ध घेतलेला निर्णय पाकिस्तान बोर्डाच्या रचनात्मक आणि जबाबदार दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दर्शवतो.” मात्र, हे सर्व माहित आहे की पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था खूप वाईट आहे आणि या कारणास्तव भारत सरकारने आशिया चषकासाठी क्रिकेट संघ तिथे न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: Mohammad Haris: “भारताला आम्ही लहान पोरांना पाठवा असं…” पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हारिसची BCCIवर टीका

सुरक्षाव्यवस्थेबाबत बोलताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “पाकिस्तानला आपल्या क्रिकेट संघाच्या सुरक्षेची खूप काळजी आहे. आम्ही या चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्हाला आशा आहे की पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यात त्यांच्यासाठी संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केली जाईल.”

हेही वाचा: Team India: चहल गेल्या सहा महिन्यांपासून एकही वन डे खेळू शकला नाही, काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळापत्रकात बदल!

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वृत्तानुसार, हा सामना आता १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. दरम्यान, बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयसीसी आणि बीसीसीआयच्या अडचणीत भर घातली आहे. १२  नोव्हेंबरला कालीपूजेमुळे पाकिस्तान-इंग्लंड सामन्याच्या तारखेत बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जर बीसीसीआय आणि आयसीसीला या सामन्याच्या तारखेत आणखी एक बदल करावा लागला तर पाकिस्तानच्या वेळापत्रकात हा तिसरा बदल असेल. भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय पाकिस्तान-श्रीलंका (१२ ऑक्टोबर) सामन्याची तारीखही बदलण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, हा सामना आता १० ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.