बँक ऑफ बडोदाची अडीच कोटींची फसवणूक

भारताचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रीधर वैद्य, भाऊ प्रफुल श्रीधर वैद्य आणि वहिनी वर्षां प्रफुल वैद्य यांच्याविरुद्ध बँक ऑफ बडोदाची दोन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत वैद्य हे सध्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. या प्रकरणामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रफुल वैद्य हे भूपती स्टील या कंपनीचे संचालक आहेत. मौजा दुर्गधामना परिसरातील ७/१२ वरील १२ (अ) आणि ८ (अ) मधील खसरा क्रमांक ७२/१ या १.७५ हेक्टर जमीनीच्या मालकीचा वाद सुरू आहे. त्यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. या जमिनीचे मूळ मालक संतोष बडवे असून आता ही जमीन त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर संतोष बडवे यांच्या नावाने आहे. पण, २००१ मध्ये प्रफुल वैद्य हे स्टील कॅरिअर या कंपनीत भागीदार असताना संतोष बडवेकडून खसरा क्रमांक ७२/१ वरील जमीन खरेदी केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, व्यवसायासाठी प्रफुल वैद्य व प्रशांत वैद्य यांनी भूपती स्टील कंपनीसाठी भांडवल उभारण्याकरिता राणी दुर्गावती चौकातील बँक ऑफ बडोदाकडे कर्जासाठी अर्ज केला. त्याकरिता वरील जमीन स्टील कॅरिअर कंपनीच्या मालकीची असल्याचे भासवून तारण ठेवले. वर्षां वैद्य यांनी कर्जाची हमी घेतली होती. त्याकरिता बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक वामन हेडाऊ यांनी २ कोटी ४० लाख रुपये कर्ज मंजूर केले होते.

 

Story img Loader