What is equation for Pakistan to reach the semifinals of ODI World Cup 2023: न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ म्हणून प्रबळ दावेदार बनला. या विश्वचषकात चारपैकी तीन संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत, ज्यात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे, तर तीन संघ चौथा संघ म्हणून शर्यतीत आहेत, ज्यात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. पण आता या संघासाठी उपांत्य फेरी गाठण्यासाठी काय समीकरण आहे, ते जाणून घेऊया.
मात्र श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर, उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान नसून न्यूझीलंड असेल हे ९९ टक्के निश्चित आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर इंग्लंडला २८७ धावांनी पराभूत करावे लागेल, जे इतके सोपे वाटत नाही. तसेच पाकिस्तान संघाला धावांचा पाठलाग करताना ६ षटकांत लक्ष्य पार करावे. जे पाकिस्तान संघासाठी जवळपास अशक्य आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना निश्चित –
सध्याच्या परिस्थितीनुसार, २०२३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. यामागचे कारण म्हणजे न्यूझीलंड संघाने ५ विजयांसह १० गुण मिळवले असून नेट रन रेटच्या आधारावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला अजून प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. पाकिस्तानला गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळायचा आहे.
पाकिस्तान संघाने इंग्लंडला हरवले तरी त्याचे १० गुण नक्कीच होतील, पण कदाचित नेट रन रेटच्या बाबतीत तो न्यूझीलंडला मागे टाकू शकेल. तीच गोष्ट अफगाणिस्तानची आहे की दक्षिण आफ्रिकेला हरवल्यास त्याचे १० गुण होतील, पण नेट रन रेटच्या आधारावर न्यूझीलंडला मागे टाकता येणार नाही. न्यूझीलंड संघाने ९ पैकी ५ सामने जिंकले असून या संघाचे नेट रन रेट +०.९२२ आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी ८ गुण असले तरी नेट रन रेटच्या बाबतीत ते किवी संघापेक्षा खूप मागे आहेत. पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध जिंकू शकत नसला तरी दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानलाही हरवू शकते. मात्र, अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर मात केली तरी, ते उपांत्य फेरीत पोहोचू शकणार नाही.