Pakistan vs India Match Weather Report: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (१४ ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२वा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आता रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असतील. दरम्यान, हवामानाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक दिवसांपासून चाहते या सामन्याची वाट पाहत होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. प्रत्येकाला रोमांचक सामना पाहायचा आहे, परंतु पाऊस त्यांच्या आशा धुळीस मिळवू शकतो. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने काय सांगितले?

आयएमडीने शेअर केलेल्या सध्याच्या हवामान अंदाजानुसार, १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी उत्तर गुजरात आणि अहमदाबादच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, “गुजरातमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.” अहमदाबादमधील हवामान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती म्हणाल्या, “आकाश ढगाळ असेल. दुसऱ्या दिवशी अहमदाबाद आणि बनासकांठासारख्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडेल. साबरकांठा आणि अरवलीत हलका पाऊस पडू शकतो.”

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: भारत-पाक संघात रंगणार विश्वचषकातील सर्वात मोठा सामना, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पावसामुळे सामना रद्द झाला तर?

पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण मिळेल. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस आहेत. अशी परिस्थिती उद्भवू नये आणि त्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find out what the weather will be like in ahmedabad during the india vs pakistan match in world cup 2023 vbm