When and where to watch live streaming of WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा लिलाव आज म्हणजेच ९ डिसेंबर रोजी होणार आहे. पाच संघ असलेली ही स्पर्धा पहिल्या सत्रात खूप लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राकडे वाटचाल करत आहे. पहिल्या सत्रात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. आता स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातसाठी एकूण १६५ महिला खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.

हे पाच संघ लावतील बोली –

विशेष म्हणजे या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रातही पाच संघ सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा पाच संघ मैदानात उतरतील, ज्यात दिल्ली कॅपिटल्स महिला, यूपी वॉरियर, रॉयल चॅलेंजर्स महिला, गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स महिला संघांचा समावेश आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या
Maharashtra Live News
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “नाशिकमध्ये आयटी पार्क आणेन”, राज ठाकरेंचं नाशिककरांना आवाहन!
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली

तथापि, पाच संघांकडे बोली लावण्यासाठी फक्त ३० स्लॉट आहेत. १६५ पैकी १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. एकूण खेळाडूंपैकी ५६ कॅप्ड आणि १०९ अनकॅप्ड खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी पाच फ्रँचायझींकडे एकूण १७.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आता हा लिलाव केव्हा, कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येणार याबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा – WPL 2024 Auction : डब्ल्यूपीएलच्या लिलावात ‘या’ पाच भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर होऊ शकतो पैशांचा पाऊस

लिलाव कधी होणार?

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी म्हणजेच डब्ल्यूपीएल २०२४ साठी लिलाव आज, शनिवार, ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

लिलाव कुठे होणार?

महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव मुंबईत होणार आहे.

कधी सुरू होणार?

मुंबईत होणाऱ्या महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.

हेही वाचा – कोणावर सर्वाधिक बोली? ‘डब्ल्यूपीएल’साठी आज १६५ क्रिकेटपटूंचा लिलाव

टीव्हीवर लाइव्ह कुठे बघता येणार?

महिला प्रीमियर लीग २०२४ साठीचा लिलाव स्पोर्ट्स १८ नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर लाइव्ह प्रसारित केला जाईल.

मोफत लाइव्ह कुठे बघता येणार?

डब्ल्यूपीएल २०२४ चा लिलाव जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटद्वारे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार आहे.