India vs Bangladesh U19 World Cup 2024 Match : शुक्रवार १९ जानेवारीपासून अंडर-१९ विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेत अंडर-१९ विश्वचषक खेळला जात आहे. भारतीय संघ शनिवारपासून १९ वर्षाखालील विश्वचषक २०२४ च्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना शेजारील बांगलादेशशी होणार आहे. उदय सहारनच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बांगलादेशला अजिबात हलके घेणार नाही.

बांगलादेशने अंतिम फेरीत भारताचा केला होता पराभव –

टीम इंडिया आपल्या अंडर-१९ विश्वचषक २०२४ च्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशचा पराभव करून विजयाने करू इच्छित आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना मंगुआंग ओव्हलवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ बांगलादेशपेक्षा खूपच सरस असला तरी विश्वचषकासारख्या स्पर्धेत बांगलादेशला हलक्यात घेता येणार नाही.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

१९ वर्षांखालील विश्वचषकात टीम इंडियाला यापूर्वीच बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला आहे. २०२० अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशने टीम इंडियाचा पराभव केला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचे पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.या विजयासह बांगलादेशने प्रथमच अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने सर्वाधिक पाचवेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने २०२२ अंडर-१९ वर्ल्ड कपही जिंकला होता. आता टीम इंडिया गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे.

हेही वाचा – Australian Open 2024 : जोकोविच, सबालेन्काची आगेकूच, पुरुषांत त्सित्सिपास, सिन्नेर पुढच्या फेरीत; महिलांमध्ये गॉफ, कोस्तयुकचे विजय

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर अंडर-१९ विश्वचषक २०२४ मधील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहू शकता. याशिवाय, सामना डिज्नी प्लस हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाईल, जिथे तुम्ही विनामूल्य सामन्याचा आनंद घेऊ शकता. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

भारताचा संघ : आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन दास, मुरुगन अभिषेक, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्या पांडे, आराध्या शुक्ला, इनेश महाजन गौडा, रुद्र पटेल, प्रेम देवकर, मोहम्मद अमन, अंश गोसाई.

हेही वाचा – PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का! झका अश्रफ यांनी दिला पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बांगलादेशचा संघ : आशिकुर रहमान शिबली (यष्टीरक्षक), आदिल बिन सिद्दीक, झिशान आलम, चौधरी मोहम्मद रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, महफुजुर रहमान रब्बी (कर्णधार), शेख पावेझ जिबोन, मोहम्मद रफी उज्जमान रफी, वासी सिद्दीकी, रोहनत दौला बोरसन, मारूफ मृधा, एमडी इक्बाल हुसैन अम्मान, अशरफुझमान बोरान्नो.