Asia Cup Final Ind vs SL live streaming where to watch: सध्या खेळला जाणारा आशिया कप अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेला भारत आणि श्रीलंकेच्या रूपाने दोन अंतिम स्पर्धक मिळाले. अंतिम सामना रविवार, १७ सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. आतापर्यंत दोन्ही संघ या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारत आणि श्रीलंकेच्या संघांनी प्रत्येकी फक्त एक सामना गमावला आहे. या दोघांमधला अंतिम सामना केव्हा, कुठे आणि कसा पाहता येईल ते जाणून घेऊया.

कुठे होणार सामना?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषकाचा अंतिम सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना कधी होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना रविवार, १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी अडीच वाजता होईल.

हेही वाचा – Asia Cup 2023: फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताची अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन, जाणून घ्या कसे असेल हवामान

टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येणार लाइव्ह सामना?

आशिया कप फायनलचे लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर केले जाईल.

लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे मोफत पाहता येणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणार्‍या आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रक्षेपित केला जाईल. मात्र, मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा केवळ मोबाइल वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असेल.

हेही वाचा – PAK vs SL: ‘जास्त सुपरस्टार बनू नका, मला माहितेय कोण…’; पराभवानंतर बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीमध्ये रंगला शाब्दिक वाद

आशिया कप फायनलसाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.

आशिया कपसाठी श्रीलंकेचा संघ –

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसांका, कुसल परेरा, सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, ड्युनिथ वेलेझ, प्रमोद मदुशन, मथिशा पाथीराना, सहान अरचेगे, दुशान हेमंथा, कासुन रजिता बिनुरा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने.

Story img Loader