IND vs SA 1st T20 Match live streaming Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका उद्यापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-२० सामना दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे खेळवला जाणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेत पोहोचून जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या सामन्याचा तुम्ही घरी बसून आनंद घेऊ शकता. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे विनामूल्य पाहता येणार जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओ सिनेमावर पाहता येणार नाही सामना –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि १ कसोटी सामना खेळवली जाणारा. सुरुवातीला सामना रात्री साडेनऊ वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र नंतर वेळ बदलण्यात आली. आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच टी-२० सामन्यांची मालिका जिओ सिनेमावर दाखवण्यात आली होती, मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका जिओ सिनेमावर दाखवली जाणार नाही. चला तुम्हाला मॅच कुठे बघता येईल ते सांगतो.

तुम्ही येथे सामना पाहू शकता –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला टीव्हीवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही तो स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. अशा परिस्थितीत सामना पाहण्यासाठी तुम्हाला तुमचे पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टारचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना १० डिसेंबरला खेळवला जाईल, दुसरा सामना १२ डिसेंबरला आणि त्यानंतर तिसरा सामना १४ डिसेंबरला खेळवला जाईल.

हेही वाचा – WPL 2024 Auction : ॲनाबेल सदरलँडसाठी दिल्ली कॅपिटल्सने खिसा रिकामा केला, अष्टपैलू खेळाडूसाठी मोजले ‘इतके’ कोटी

टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे आकडेवारी –

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आतापर्यंत एकूण २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. टीम इंडियाने प्रोटीज संघाविरुद्ध १३ सामन्यांत बाजी मारली आहे, तर प्रोटीज संघाने १० सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा – WPL 2024 Auction : काशवी गौतम ठरली सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू, गुजरात जायंट्सने लावली करोडोंची बोली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find out where to watch live streaming of the first t20 match between india and south africa vbm