Who is Vrinda Ghanshyam Rathi : वृंदा घनश्याम राठी यांच्यासाठी ९ वर्षातील भारतीय महिला संघाची पहिली घरची कसोटी खास ठरली आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वृंदा राठी यांनी इतिहास रचला. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला कसोटी पंच ठरल्या. त्यांचा जन्म ज्या शहरात झाला, त्या नवी मुंबईत त्यांनी कसोटी पंच म्हणून पदार्पण केल्याने राठी यांच्यासाठी हा प्रसंग आणखी खास बनला आहे.
वृंदा २०१४ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेली पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्या. तसेच चार वर्षांनंतर २०१८ मध्ये, ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तेव्हापासून, ३४ वर्षीय वृंदा यांनी १३ एकदिवसीय आणि ४३ टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्यांना २०२० मध्ये पंचांच्या आयसीसी विकास पॅनेलमध्ये पदोन्नती देण्यात आली. राठी युनायटेड किंगडममधील बर्मिंघम येथे २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही दिसल्या होत्या.
या वर्षी त्या एकामागून एक अंपायरिंग रेकॉर्ड बनवताना दिसत आहेत. १० जानेवारी २०२३ रोजी, नारायण जननी यांच्यासमवेत, भारतातील पुरुषांच्या देशांतर्गत सामन्यात मैदानी पंच म्हणून पहिल्या महिला पंच ठरल्या. या दोघांनी रणजी ट्रॉफीच्या २०२२-२३ हंगामात गोवा आणि पाँडेचेरी यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम पाहिले.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : ठरलं! ‘या’ शहरात रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला
राठी यांनी दक्षिण आफ्रिकेतील २०२३ मधील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत अंपायरिंग केले होते. त्यानंतर चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि पहिल्या प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून जबाबदार पार पाडली. भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतही राठी अंपायरिंग करताना दिसल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत अखिल भारतीय ‘अंपायरिंग शो’मध्ये समावेश आहे. राठी यांच्या व्यतिरिक्त, इतर मैदानावरील पंच केएन अनंतपद्मनाभन आहेत. भारताचे वीरेंद्र शर्मा हे तिसरे पंच आहेत, तर जीएस लक्ष्मी सामनाधिकारी आहेत.