Who will have custody of their child after Sania Mirza Khula to Shoaib Malik : क्रीडाविश्वातील बहुचर्चित कपल सानिया मिर्झा आणि शोएब मलिक आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्यामुळे त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती आता समोर आली आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने त्याच्याकडून खुला घेतल्याचे समोर आले आहे. आता या सर्वांमध्ये आणखी एक चर्चा सुरू आहे की सानिया आणि शोएबचा पाच वर्षांचा मुलगा इझहान कोणाकडे राहणार?
इझहानचा ताबा कोणाला मिळणार?
खरं तर, जेव्हा पती-पत्नीमध्ये घटस्फोट होतो, तेव्हा मुलाचा ताबा देखील कायदेशीररित्या दिला जातो. पण इथे सानियाने शोएबकडून ‘खुला’ घेतल्याची माहिती मिळाली आहे. ‘खुला’मध्ये कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नाही आणि अशा परिस्थितीत पत्नी स्वतःच्या इच्छेने पतीपासून विभक्त होऊ शकते. यामध्ये पती पत्नीला पोटगी देण्यासाठी बांधील नसतो. पण आता मुलांच्या ताब्याबाबत काय नियम आहेत, जाणून घेऊया.
मुलाचा ताबा घेण्याचे काय आहेत नियम?
हिंदू धर्मात घटस्फोटानंतर कोर्टात ताब्याचा खटला असतो. यामध्ये कायदेशीर प्रक्रियेनंतरच ताब्याबाबत निर्णय घेतला जातो. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम धर्मातील मुलांच्या ताबा घेण्याबाबत निर्णय घेते. परंतु त्यांच्या कायद्यानुसार मूल सात वर्षांचे होईपर्यंत त्याचा ताबा आईकडेच असतो.
त्यानंतर, जर आई मुलाची काळजी घेण्यात अपयशी ठरली, तर अशा स्थितीत ताबा वडिलांकडे जाऊ शकतो, अन्यथा आईला तो अधिकार आहे. सध्या इझान सतत त्याची आई सानिया मिर्झासोबत दिसतो. सानियाही इन्स्टाग्रामवर इझहानसोबत वारंवार पोस्ट करत असते. शोएबही वेळोवेळी इझहानबरोबरचे फोटो शेअर करत असतो. सुमारे २-३ आठवड्यांपूर्वी देखील शोएबने इझहानबरोबरचा एक पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा – Sania-Shoaib Divorce : सानिया-शोएबच्या घटस्फोटाची पद्धत असलेला ‘खुला’ नेमका आहे काय? जाणून घ्या
२०१० साली झाला होता विवाह
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकची दुसरी पत्नी होती. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबाद येथे या दोघांचा विवाह संपन्न झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ साली दोघे इझहानचे पालक झाले. मागच्या काही वर्षांपासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याबद्दल दोघांनीही जाहीर वाच्यता केली नाही किंवा नात्यामधील तणाव बाहेर दाखवला नव्हता. त्यानंतर थेट शनिवारी शोएब मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या चाहत्याना याची बातमी कळली.