चॅम्पियन्स करंडकातील शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ षटकांच्या गतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. कर्णधार जॉर्ज बेलीच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के आणि संघातील सहकाऱ्यांना सामन्याच्या मानधनातून १० टक्के दंड भरावा लागणार आहे. आयसीसीच्या नियमावलीतील कलम २.५.१ अनुसार प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी संघातील खेळाडूंना १० टक्के आणि कर्णधाराला त्याच्या दुप्पट सामन्यातील मानधन दंड म्हणून भरावे लागते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्धारित वेळेनंतर एक षटक टाकल्याने त्यांच्यावर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ही चूक मान्य केल्याने त्यांना हा दंड भरावा लागणार आहे.
षटकांच्या संथ गतीमुळे ऑस्ट्रेलियाला दंड
चॅम्पियन्स करंडकातील शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ षटकांच्या गतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे.
First published on: 09-06-2013 at 07:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine on australia team for slow over rate