चॅम्पियन्स करंडकातील शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ षटकांच्या गतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. कर्णधार जॉर्ज बेलीच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के आणि संघातील सहकाऱ्यांना सामन्याच्या मानधनातून १० टक्के दंड भरावा लागणार आहे. आयसीसीच्या नियमावलीतील कलम २.५.१ अनुसार प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी संघातील खेळाडूंना १० टक्के आणि कर्णधाराला त्याच्या दुप्पट सामन्यातील मानधन दंड म्हणून भरावे लागते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्धारित वेळेनंतर एक षटक टाकल्याने त्यांच्यावर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी दंड ठोठावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ही चूक मान्य केल्याने त्यांना हा दंड भरावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा