श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज महेला जयवर्धने बोटाला झालेल्या दुखापतीमुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. ‘‘सिंहलीज स्पोर्ट्स क्लबकडून नॅशनल क्रिकेट क्लबविरुद्धच्या स्थानिक प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना जयवर्धनेच्या डाव्या हाताच्या बोटाला झेल घेताना ही दुखापत झाली’’, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या पत्रकाद्वारे समजते. जयवर्धनेला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान चार ते सहा आठवडय़ांचा कालावधी लागेल.

Story img Loader