Virat Kohli on Sachin Tendulkar: विराट कोहली म्हणाला की, “२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे.” कोहलीने रविवारी ३५व्या वाढदिवसानिमित्त विश्वचषकातील सामन्यात १२१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४९वे शतक होते, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सचिनची बरोबरी केली आहे. या विक्रमानंतर सचिनने विराट कोहलीचे ट्वीट करून अभिनंदन केले होते आणि कोहली लवकरच आपले ५०वे शतक झळकावेल आणि त्याचा विक्रम मोडेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

सामन्यानंतर कोहलीने बीसीसीआयच्या एका व्हिडीओमध्ये सचिनच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर सांगितले की, “माझ्यासाठी ही खूप भावनिक गोष्ट आहे. मी त्यांना आदर्श मानून मोठा झालो, भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न होते. त्यांना खेळताना पाहणे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या विक्रमाची बरोबरी करणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. इथपर्यंत पोहोचेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो.”

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …

४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर, कोहली म्हणाला की, सचिन तेंडुलकर त्याच्यासाठी नेहमीच नंबर वन असेल. माझे करिअर इथपर्यंत पोहोचले याचा मला आनंद आहे. कोहली म्हणाला, “मी सामन्यानंतर म्हटल्याप्रमाणे, काहीही झाले तरी माझ्यासाठी ते नेहमीच नंबर वन असतील. माझा आजवरचा प्रवास हा त्यांच्यामुळेच झाला आहे. मी इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. मी माझ्या देशासाठी सामने जिंकत आहे, जसे त्यांनी (सचिन तेंडुलकर) कौतुक केले.”

विराट कोहलीने केले फिंगर क्रॉस, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये सचिनची इच्छा पूर्ण करायची आहे

विराट कोहलीचे अभिनंदन करताना सचिन तेंडुलकरने लिहिले होते, “विराट खूप चांगला खेळला. ९९चे १०० करण्यासाठी मला ३६५ दिवस लागले होते. मला आशा आहे की, तू ४९ वरून ५० करण्यासाठी पुढील काही दिवसात माझा विक्रम मोडणार. अभिनंदन!”

हेही वाचा: BAN vs SL: अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट दिल्याने इयन बिशप भडकले; म्हणाले, “शाकिबने स्वार्थीपणा…”

या ट्वीटला उत्तर देताना विराट कोहलीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “मी देखील याच गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो आहे कारण, जर मी असे केले तर याचा अर्थ आमच्याकडे जिंकण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे मला या स्पर्धेत आणखी काही वेळा अशी खेळी करायला आवडेल, विशेषत: मोठ्या स्पर्धांमध्ये, उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत.” असे म्हणत त्याने फिंगर क्रॉस केले.

Story img Loader