Virat Kohli Owned Restaurant One8 Commune: विराट कोहलीच्या मालकीचे रेस्टॉरंट One8 Commune विरोधात बंगळुरू पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सध्या विराट कोहली लंडनमध्ये आहे. टी-२० विश्वचषक विजयाचा मुंबईत कार्यक्रम झाल्यानंतर विराट कोहली लगेच लंडनसाठी रवाना झाला. पण आता बंगळुरूमधील त्याच्या मालकीच्या One8 Commune रेस्टॉरंटविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पण नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

High Court questions state government on celebrating Tipu Sultan birth anniversary Mumbai news
टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सेंट्रल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली, “आम्हाला काल रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा सुरू असणारे सुमारे ३-४ पब आढळले आहेत. मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. पब फक्त पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, असे डीसीपी त्यांनी सांगितले.

एमजी रोडवर असलेला विराट कोहलीच्या मालकीचे One8 Commune हे रेस्टॉरंट चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमजवळ आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराटच्या या रेस्टॉरंटबरोबर त्या परिसरातील इतरही काही पब आणि रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याच्या तक्रारी आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

हेही वाचा – रवी शास्त्रींनी ICC ला दिली आयडियाची कल्पना, म्हणाले….

६ जुलै रोजी विराटच्या मालकीचे रेस्टॉरंट हे बंद करण्याच्या नियोजित वेळेच्या २० मिनिटांनंतर म्हणजेच पहाटे १.२० वाजताही खुले असल्याचे आढळले. वेळेचे उल्लंघन केल्यामुळे हा एफआयआर दाखल करण्यात आला. रात्री गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षकांना One8 Commune रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मध्यरात्री १:२० वाजता तिथे पोहोचल्यावर, उपनिरीक्षकांनी विराटच्या मालकीचे हे रेस्टॉरंट अजूनही सुरू असल्याचे आढळले आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

विराट कोहलीच्या One8 Commune च्या दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता सारख्या इतर मेट्रो शहरांमध्येही शाखा आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेंगळुरू शाखा सुरू करण्यात आली होती. विराट-कोहलीच्या मालकीचे One8 Commune गेल्या वर्षीही चर्चेत होते, जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने One8 Commune फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) द्वारे कॉपीराइट केलेली गाणी वाजवण्यास प्रतिबंध केला होता.

Story img Loader