Shubaman Gill, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस खूपच कंटाळवाणा होता, पण यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिलने आपल्या डान्सच्या अदाकारीने चाहत्यांचे नक्कीच मनोरंजन केले. खरं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमानांनी अवघ्या काही षटकांतच भारतीय संघासमोर गुडघे टेकले. संपूर्ण संघ अवघ्या १५० धावांवर आटोपला, त्यानंतर जेव्हा दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ८० धावाही फलकावर लावल्या. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी हा पहिला दिवस कंटाळवाणा होता, पण गिलच्या डान्स मूव्हने त्यांचे नक्कीच मनोरंजन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यजमानांना १५० धावांत गुंडाळल्यानंतर, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८० धावांची भर घातली आहे आणि आता पहिल्या डावाच्या आधारे यजमानांपेक्षा फक्त ७० धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, विंडीजचा संघ ऑलआऊट होण्याच्या जवळ असताना संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल कूल मूडमध्ये डान्स करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs WI: मोहम्मद सिराज बनला ‘सुपरमॅन’! हवेत डायव्हिंग करत एका हाताने पकडला अप्रतिम झेल, पाहा Video

शुबमन शांतपणे नाचत असताना, पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला माजी कर्णधार विराट कोहली त्याच्याकडे एक नजर टाकतो आणि नंतर मैदानावरील त्याच्या उर्वरित क्षेत्ररक्षकांकडे पाहू लागतो. यावेळी कोहलीने गिलसोबत मैदानात एकत्र डान्स केला, तो अनेकदा अशा हलक्याफुलक्या पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

हेही वाचा: IND vs WI: नाद करायचा नाय! बाप-बेट्याची विकेट घेऊन अश्विनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

सामन्यात काय झाले?

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बुधवारपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रविचंद्रन अश्विनसमोर त्यांचा एकही फलंदाज फार काळ तग धरू शकला नाही. वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ १५० धावा करून ऑलआऊट झाला. अश्विनने २४.३ षटकात ६० धावा देत ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. कसोटी क्रिकेटच्या एका डावात अश्विनने ५ विकेट्स घेण्याची ही त्याची ३३वी वेळ आहे.

अश्विन व्यतिरिक्त रवींद्र जडेजाने तीन, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी भारताने २३ षटके फलंदाजी केली आणि एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या. युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (४०*)ने कसोटी पदार्पण खेळताना नाबाद ७३ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार मारले. त्याचा साथीदार असलेला कर्णधार रोहित शर्माने ६५ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३० धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First danced then caught shubman gills dance moves brought interest to the match watch the video avw