Virender Sehwag on Team India: एका कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघातील होणाऱ्या बदलांवर सूचक विधान केले आहे. त्याच्यामते संघातील बदल हे सहज आणि हळुवारपणे पण टप्याटप्याने झाले पाहिजेत. त्याला भारतीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, “आता टीम इंडियामध्ये बदलाचा टप्पा हळूहळू सुरू झाला पाहिजे, जसे १०-१२ वर्षांपूर्वी झाला होता.”
वीरू पुढे म्हणाला की, “भारतातील बहुतेक स्टार क्रिकेटपटू आता ३५+ वयोगटातील आहेत. अशा स्थितीत १० वर्षांपूर्वी जसे आधी गौतम गंभीर मग मी आणि युवराज सिंग यांना ज्या पद्धतीने काढले होते त्याच पद्धतीने बदलाची सुरुवात व्हायला हवी. त्यावेळी जे केलं तेच आताच्या निवडकर्त्यांनी करण्याची गरज आहे.” अमर उजाला या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना सेहवागला विचारले की, “तुला भारतीय क्रिकेटचे भविष्य काय दिसते? नवीन खेळाडूंना वेळ देण्याची संधी आली आहे का? आयपीएलने काही चांगले खेळाडू पाहिले आहेत, त्यामुळे नवीन संघ तयार करण्याची ही योग्य वेळ आहे असे तुला वाटते का? विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या जुन्या खेळाडूंनी हळूहळू पायउतार व्हावे आणि मागे बसावे?” या सर्व प्रश्नांवर त्याने सविस्तर उत्तरे दिली.
भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल चांगले आहे -सेहवाग
भारतीय क्रिकेटमधील बदलांवर सेहवाग म्हणाला, “भारतीय क्रिकेटचे भविष्य खूप चांगले आहे हे मला नक्कीच समजते. जर तुम्ही आयपीएल बघितले तर भारतीय क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा आहे, मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी. पण जर विराट कोहली किंवा रोहित शर्मासारखे वरिष्ठ खेळाडू ३३-३ किंवा ३५ वर्षांचे असतील तर थोडा धीर धरावा लागेल. त्यांच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. बदलाची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली पाहिजे. ती एक-एक असावे.”
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “जर तुम्ही या सर्वांना एकत्र फेकले तर कदाचित आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे कदाचित आता योग्य वेळ नाही, पण एक वेळ नक्कीच येईल जेव्हा बदल घडेल. जेव्हा आपण भारतीय संघात खेळायचो, तेव्हा आधी गौतम गंभीरला वगळले, नंतर सेहवाग, युवराज सिंग आणि शेवटी सचिन तेंडुलकर. हळूहळू एक-एक खेळाडू बाहेर पडला आणि त्याच्याजागी बदली खेळाडू येत राहिले आणि भारतीय संघ स्थिर झाला. एकाच वेळी तीन-चार खेळाडूंना काढून टाकले तर संघावर दडपण येईल आणि अडचणीही येतील. या स्थितीत द्विपक्षीय मालिका जिंकणे कठीण होईल.”
सेहवागने ‘या’ खेळाडूंना संघात घ्यावे असे वाटते
सेहवाग म्हणाला, “अशी अनेक मुले आहेत जी चांगली आहेत. पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल (जो अजूनही संघात आहे), इशान किशन हे माझे आवडते प्रतिभावान खेळाडू आहेत. बघा, इशानने एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकले पण त्यानंतर त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. यश दयाल, रवी बिश्नोई जे अप्रतिम लेग-स्पिनर आहे. त्यामुळे असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे नजीकच्या काळात टीम इंडियाचे सुपरस्टार होतील, पण त्याला वेळ लागेल. आता ही योग्य वेळ आहे असे मला वाटत नाही, कारण रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये असे माझे मत आहे. जेव्हा तुम्ही शांत असाल, तेव्हा भारतीय संघासाठी काय चांगले असू शकते हे तुम्ही ठरवावे.”