विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत, त्या Ashes मालिकेकडे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. या मालिकेपासून कसोटी क्रिकेटमध्ये नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीमागे त्यांचं नाव आणि क्रमांक लिहीला जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी आपल्या संघाचा लूक सोशल मीडियावर जाहीर केला आहे.

Ashes मालिकेपासून आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टपासून एजबस्टनमध्ये पहिला सामना रंगणार आहे. कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांचा ओढा वाढावा आणि रोडावलेली प्रेक्षकसंख्या आणखी वाढावी यासाठी आयसीसीने कसोटी क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केला आहे.

Story img Loader