करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. तरीदेखील IPL च्या आयोजनाचा आग्रह धरणाऱ्यांना पुजाराने सुनावले आहे.
Video : धोनीने पहिल्यांदा फलंदाजाला स्टम्पिंग केलं, तेव्हा गोलंदाज कोण होतं माहित्येय का?
“लॉकडाउन काळात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण साऱ्यांनी घरी थांबायला हवं. प्रत्येकाने करोनाचा धोका ओळखायला हवा आणि जरी घरात राहणं कंटाळवाणं असेल, तरीही घरातून बाहेर पडू नये. कारण सध्या आपण एक लढा देत आहोत. करोनाशी लढा देताना संयम आणि शिस्त खूप महत्त्वाची आहे. क्रिकेट खेळताना मी ज्या गोष्टींचा अवलंब करतो, त्या गोष्टींचा मला करोनाशी लढताना उपयोग होत आहे. माझ्याकडे मानसिक बळ आहे. त्याचा मला करोनाशी लढा देण्यासाठी फायदा होत आहे”, असे पुजारा म्हणाला.
World Cup Final : धोनी चित्रपटात न दाखवलेल्या प्रसंगाबाबत सचिन-सेहवागचा मोठा खुलासा
“करोनाचा फटका हा क्रिकेटचा हंगाम संपण्याच्या आसपास आल्याने फार चांगले झाले. रणजी करंडक संपल्यानंतर मी एक-दोन आठवडे विश्रांती घेणारच होतो. आताची विश्रांती थोडी मोठी आहे. क्रिकेट पुन्हा कधी सुरू होणार याबाबत काहीही कल्पना नाही. पण सध्या करोनामुळे लोक ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत, त्या परिस्थितीत क्रिकेटचा विचार करणंही चुकीचं आहे. करोना हा अत्यंत जीवघेणा असा विषाणू आहे. त्याचा साऱ्यांनी मिळून सामना केला पाहिजे. हा एक प्रकारचा लढाच आहे. त्यामुळे आधी सगळं सुरळीत होऊ दे त्यानंतरच क्रिकेटचा विचार करूया”, असे पुजाराने स्पष्ट केले.
गेले काही दिवस IPL च्या आयोजनाबाबत चर्चा रंगली आहे. अनेकांनी IPL 2020 व्हायला हवं याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. त्या साऱ्यांना पुजाराने चांगलाच टोला लगावला आहे.